Type to search

Breaking News Featured maharashtra आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या सेल्फी

Video : कणखर बनून संकटांवर मात करा; ‘गर्ल ऑन द विंग चेअर’ दिक्षा दिंडे हिच्याशी संवाद

Share

नाशिक । प्रतिनिधी

अपंग कोणीच नसते. मनाने कणखर असाल तर निर्माण होणार्‍या संकटावर मात करता येते. तुमची जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास या बळावर तुम्ही संकटांपुढे न झुकल्यास ही संकटेच तुम्हाला सलाम ठोकतात. फक्त मनावर आणि मनगटावर विश्वास हवा. आपल्यातील कमतरतांचे भांडवल न करता शांतपणे क्षमतांचा विकास करून उणिवांवर मात करा. असे आवाहन राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त, ग्लोबल युथ अँबेसेडरचा मान मिळवणार्‍या दिव्यांग गर्ल ऑन विंगचिअर दिक्षा दिंडे हिने केले.

जन्मजात शारीरिक व्यंग असूनही अजिबात न डगमगता वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी युनायटेड नेशन्सच्या ‘वर्ल्ड अ‍ॅट स्कूल’ या उपक्रमाची भारतीय शिक्षण राजदूत बनण्याचा मान दीक्षा चित्ररेखा हेमंत दिंडे या 25 वर्षीय तरुणीने मिळवला आहे.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दिक्षा नाशकात आली आहे. यावेळी तिने देशदूत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी तिने तिच्या आतापर्यंतच्या आयुष्यातील पैलू उलगडले.

दिक्षा म्हणाली, विविध प्रकारे शाररीक तसेच मानसिक दिव्यांग असणारे युवक आज हतबल होताना दिसत आहेत. पंरंतु त्यांना वेगळी वागणुक देण्यापेक्षा, समाजातून वेगळे समजण्यापेक्षा ते आपल्यापैकी एक आहेत याची जाणीव ठेवून प्रत्येकाने वागल्यास सर्व सामावेशक समाज निर्मितीतून त्यांच्यात आपलेपणाची भावना निर्माण होते. तर दिव्यांगांनी एकदा आपले व्यंग मान्य केले की जगण्यात निराशा येत नाही.

आपल्यात असणार्‍या कमतरतांचे भांडवल करत रडत बसण्यापेक्षा शांतपणे आपल्यातील दुसर्‍या क्षमतांचा विकास करून उणिवांवर मात करणे शक्य असते. एखाद्या गोष्टीवर रडत बसण्यापेक्षा तीच्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करत राहणे यालाच जीवन म्हणतात.

माझा जन्म झाला तेव्हा सर्व कुटुंब आनंदात होते. पंरतु पुढे मला चालता येणार नसल्याचे डॉक्टररांनी स्पष्ट केल्यानंतर नातेवाईकांनी टाळाटाळ सुरू केली.

समाजाने नावे ठेवणे सुरू केले. परंतु मला चालता यावे यासाठी आई – वडीलांनी विविध डॉक्टर, औषधोपचार, देव, नवस जे शक्य होते ते ते सर्व केले. शिक्षणासाठी सामान्य शाळांनी नकार घंटा दाखवली. यामुळे मनपा शाळेतून शिक्षण घेतले. अशात 2005 ला वडीलांचा अपघात झाला.

आई कपड्यांची शिलाई तसेच मिळेल ते काम करून कुटुंब साभांळत होती. लोकांची नाही नाही ती बोलणी ऐकावी लागत होती. आपल्यामुळे कुटुंबियांना हाल सहन करावे लागतात असे वाटून अनेकदा आत्महत्येचे विचार मनात येत होते. परंतु आईची धडपड पाहुण आपणही काही करू शकतो याची उम्मेद घेऊन नव्या जोमाने अभ्यास सुरू केला. युपीएसची चा अभ्यास करताना अनेक संस्थांशी संपर्क आला.

तसेच युनायटेड नेशनचे संकेतस्थळ शोधताना त्यांच्या शिष्यवृत्तींची माहिती मिळाली तसेच संयुक्त राष्ट्राच्या ग्लोबल युथ अँबेसेडची माहिती मिळाली सहज अर्ज केला असता त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

त्यांच्याशी चर्चा करून आपले शिक्षणाबाबतची ध्येय धोरणे या विचारांनी प्रभावीत होऊन त्यांनी आपणास ग्लोबल युथ अँबेसेडचा मान दिला. यानंतर प्रथमच घराबाहेर पडून मलेशियाला गेले. जाताना एअर इंडिया कंपनीने अपंग असल्याचे कारण दाखवत प्रवास करण्यास नकार दिला.

यावरून त्यांच्यांशी भांडून आपला हक्क आपण मिळवला येथून हक्कासाठीची लढाई सुरू झाली. पुढे दक्षिण कोरीया, अफ्रिका या देशांमध्ये जावून काम केले. यासह आता रोशनी व इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून महिलांची मासिक पाळी संदर्भात जनजागृती, रस्त्यावरील मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न, दिव्यांग, दृष्टहीन विद्यार्थ्यांसाठी कार्य अशी आपण सुरू केले असून अनेकांचे यात सहकार्य लाभत आहे.

आपणास इतरांसाठी नाही तर स्वतः एक ब्रॅण्ड म्हणून उभे राहावयाचे आहे. नेता नाही परंतु नेतानिर्माता नक्कीच व्हायचे आहे. अशी दुर्दम्य इच्छा दिशा यांनी व्यक्त केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!