सारस्वत बँकेकडून डिजिटल प्रोत्साहन; नाशिकसह दहा जिल्ह्यात फेअर प्राईस शॉप्स उभारणार

0
मुंबई : सारस्वत बँकेला महाराष्ट्र शासनाकडून राज्यात दहा जिल्ह़यांत फेअर प्राईस शॉप्स म्हणजेच रेशनिंग दुकांनात व्यावसायिक प्रतिनिधी आणि आधार कार्ड आधारित पेमेन्ट्स सेवा पुरवण्यासाठी नियुक्त करण्यात आले.

राज्यात साधारण 51 हजार एफपीएस असून यामुळे दारिद्ऱय रेषेखालील आणि दैनंदिन व्यवहारात बँकेचा वापर न करणाऱया समाजातील व्यक्तींना परवडणा़र्‍या दरात सेवा उपलब्ध करून देण्यास सरकारला मदत होईल.

नाशिकसह सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सोलापूर, सांगली, अकोला, नागपूर, पुणे आणि जळगाव या जिल्ह़यांसाठी सारस्वत बँकेची नियुक्ती करण्यात आली. या एफपीएसमध्ये बँकेचे व्यावसायिक प्रतिनिधी असून विविध बँकिंग सेवा पुरविण्यात येतील.

याव्यतिरिक्ति दुकानांच्या माध्यमातून कोणताही बँकेच्या खातेधारकाला व्यवहार करता येईल. महाराष्ट्र शासनाकडून सारस्वत बँकेसह तीन बँकांची नियुक्ती करण्यात आली.

मायक्रो एटीएमची उपलब्धता : रेशन दुकानांना उपक्रमात समाविष्ट करण्याची प्रक्रिया संबंधित जिल्ह़यातील आघाडीच्या बँकेच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे डिजिटायझेशन करून मायक्रो एटीएम उपलब्ध करण्याचे काम सरकारकडून करण्यात येईल. नागरिकांना खाते उघडणे, पैसे भरणे, काढणे अथवा हस्तांतरित करणे यासारख्या सुविधा पुरविल्या जातील.

LEAVE A REPLY

*