पिंपळनेरला कांद्यांची आवक वाढली

0
पिंपळनेर । दि. 29 । वार्ताहर-पिंपळनेर कांदा मार्केटमध्ये कांद्याला विक्रमी भाव, 1500 रुपये मिळाला. प्रति क्विंटल, दोन दिवस मार्केट बंद असल्याने दि. 29 रोजी लिलाव झाला.
पिंपळनेर परिसरात गेल्या 4/5 दिवसापासून संततधार पावसामुळे शेतीमालासह भाजीपाला काढण्यासाठी शेतकर्‍यांना अतिकष्ठ करावे लागत आहे. तसेच सोमवार, मंगळवारी 700 ते 1100 रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळाल्याने पिंपळनेर मार्केटमध्ये कांद्याची मोठी आवक वाढली होती.

पर्यायाने व्यापार्‍यांनाही साठवण्यासाठी शेड अथवा गोडावून कमी पडत असल्याने गुरुवार, शुक्रवारी कांदा मार्केट बंद ठेवावे लागले होते. त्यात पावसाची संततधार सुरुच होती. कांदा लिलाव उघड्यावरच होत असल्याने नुकसानीची झळ बसते.

आज दि. 29 रोजी पुन्हा कांदा मार्केट सुरु झाले. साक्री तालुक्यासह सटाणा, नवापूर तालुक्यातून ही कांदा भरलेले ट्रॅक्टर, पिकअपसह मिळेल त्या वाहनाने शेतकर्‍यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता.

सकाळी 11 वाजता लिलाव सुरु झाला. तर उत्तम प्रतिचा कांदा 1500 रुपयापर्यंत भाव मिळाल्याने शेतकर्‍यामध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण होते.

शेतकरी चाळीत साठवलेला माल (कांदा) पिंपळनेर मार्केटमध्ये दररोज आणत आहे. यावेळी कांदा व्यापार्‍यांनी परराज्यात कांद्याची मागणी वाढली असून पावसामुळे मोठ्या शहरापर्यंत कांदा उपलब्ध नाही.

त्यामुळे कांद्याने उसळी घेतल्याचे सांगितले. असाच भाव सुरु राहिल्यास साठवून ठेवलेला कांदा उत्पादक शेतकर्‍यांना नक्कीच अच्छे दिन आलेत म्हणावे लागेल. कांद्याची आवक वाढल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

LEAVE A REPLY

*