शांतता समितीची बैठक

0
धुळे । दि.29 । प्रतिनिधी-मोहाडीनगर पोलिस स्टेशनला अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली दि.31 जुलै रोजी मोहाडी पोलिस स्टेशन हद्दीतील लांडोर बंगला परिसरात भीमस्मृती दिनानिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमत जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ, उपनिरीक्षक स्वप्नील राजपूत उपस्थित होते.
सदर बैठकीला शहरातील दलित समाजाचे, सर्व पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते व नेते एम.जी.धिवरे, वाल्मीक दामोदर, संजय पगारे, शशिकांत वाघ, सिध्दार्थ बोरसे, राज चव्हाण, किरण जोंधळे, आनंदराव बागूल, सुरेश लोंढे, प्रा.अनिल दामोदर, देवा केदार, प्रमोद सोनवणे, विशाल पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत अपर पोलिस अधीक्षक यांनी दि.31 जुलै रोजी लांडोर बंगला येथे साजरा होणार्‍या भीमस्मृती यात्रेनिमित्ताने येणार्‍या भाविकांनी त्यांचे चारचाकी वाहने लांडोर बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या खाली पार्किंगस्थळी पार्किंग करण्याबाबत अपर पोलिस अधीक्षक यांनी सूचना दिल्या.

सदर बैठकीला दलित समाजाचे कार्यकर्ते व नेते यांनी त्यांना यात्रेत येणार्‍या अडचणींसंदर्भात मुद्दे उपस्थित केले. चर्चेअंती सर्व नेत्यांनी मुख्य प्रवेशद्वाराच्या खाली पार्किंग करण्याबाबत तसेच लांडार बंगला वरती जाण्यासाठी फक्त दुचाकी वाहनाचा वापर करण्यात येईल.

तसेच भीमस्मृती यात्रेत समता परिषदेचे जास्तीत जास्त स्वयंसेवक उपस्थित राहतील, याबाबत नियोजन करण्यात आले आहे. तसेच पोलिस प्रशासनाला जास्तीत जास्त सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले आहे.

अपर पोलिस अधीक्षक यांनी भीमस्मृती यात्रेनिमित्ताने कायदा व सुव्यवस्था या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त बंदोबस्त उपलब्ध करुन भिमस्मृती यात्रा उत्साहाने साजरी करावी, असे आवाहन केले आहे.

 

LEAVE A REPLY

*