पंचायतराज समिती पाच जुलैपासून जिल्हा दौर्‍यावर

0
धुळे/निजामपूर । प्रतिनिधी/ वार्ताहर-पंचायत राज समिती दि. 5 जुलैपासून पंचायत राज समिती जिल्हा दौर्‍यावर येत असून जिल्ह्यात विविध ठिकारी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या समितीमध्ये 23 सदस्यांचा समावेश आहे.
23 सदस्यांचा समावेश असलेल्या या समितीत सचिवालयाचे उपसचिव, दोन कक्ष अधिकारी, कार्यकारी समितीचे स्वीय सहाय्यक, चार कर्मचारी व चार प्रतिवेधक यांचा समावेश राहणार आहे.
दि. 5 रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील विधान मंडळाच्या सदस्यांशी शासकीय विश्राम गृहात चर्चा होणार आहे.

त्यानंतर 10.30 ते 11 या वेळेत जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांची समितीची चर्चा होईल. 11 वाजता 2008-9 आणि सन 2011 ते 2012 च्या लेखा परिक्षा पुर्णविलोकन अहवालातील धुळे जिल्हा परिषदेच्या संबंधातील परिच्छेदा संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे.

तर दि. 6 जुलै रोजी जिल्ह्यातील पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जि.प. प्राथमिक शाळा, ग्रामपंचायतींना समितीचे सदस्य भेटी देऊन पाहणी करतील.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच संबंधित अधिकार्‍यांशी यावेळी चर्चा होणार आहे. दि. 7 रोजी जि.प.च्या सन 2012-13 च्या वार्षिक प्रशासनाच्या अहवाला संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष नोंदविली जाईल.

या समितीमध्ये आ. प्रकाश भारसाकळे, आ.विकास कुंभारे, आ. आर.टी.देशमुख, आ. समीर कुणावार, आ. कृष्णा गजबे, आ.अनिल बाबर, आ. हेमंत पाटील, आ.अ‍ॅड.के.सी.पाडवी, आ. अमित झनक, आ. सुरेशभाऊ लाड, आ. अनिल तटकरे, आ. रामहरी रुपनवर, आ. अनिल गोटे, आ. भिमराव तापकीर, आ. उन्मेष पाटील, आ. राजेंद्र नजरधने, रमेश बुंदिले, आ. भरतशेठ गोगावले, आ. राजाभाऊ वाजे, आ. बसरवराज पाटील, आ.राहुल मोटे, आ.दीपक चव्हाण, आ. चंद्रकांत रघुवंशी यांचा समावेश आहे.

2011-12च्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात ही समिती धुळे येथे भेट देत आहे. यावेळी होणार्‍या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह जिल्ह्यातील पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जि.प.प्राथमिक शाळा, ग्रामपंचायती यांना भेटी देणार आहे.

पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व संबंधित अधिकार्‍यांशी प्रश्नावली क्र.2 च्या संदर्भात यावेळी साक्ष होणार आहे.

पंचायतराज समितीचा दौरा जि.प., पं.स. प्रशासनाच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचा असल्याने या संदर्भात यंत्रणेला माहिती कळविण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासंबंधी प्रलंबित विभागीय चौकशीप्रकरणी कार्यभार असणार्‍या उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे.

पंचायतराज यंत्रणेचे बळकटीकरण व्हावे, त्या स्तरावर राबविण्यात येणार्‍या योजनांचा लाभ सर्व लाभधारक घटकांना व्हावा आणि या योजनेतील अंमलबजावणीच्या त्रुटी दूर व्हाव्यात म्हणून पंचायतराज स्तरावर शासन विशेष लक्ष देत असते.

पंचायतराज समिती दरवर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यात जावून त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या स्तरावर सुरु असलेल्या कामकाजाची माहिती घेत असते.

त्यामुळे कामकाजातील त्रुटी दूर करुन समितीसमोर आपल्या कामकाजाचे चांगले प्रतिबिंब उमटावे, यासाठी अधिकारीवर्ग व कर्मचारी विशेष काळजी घेतांना दिसते.

 

LEAVE A REPLY

*