आज योगदिन : सरकारी कर्मचार्‍यांना खादीची सक्तीची

0
धुळे । दि.7 । प्रतिनिधी-योगदिनासाठी प्रत्येक शासकीय अधिकार्‍याने खादीचा पोशाख परिधान करूनच उपस्थित रहावे, असे आदेश शासनातर्फे देण्यात आले आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशीचे प्रतीक असलेल्या आणि त्यानंतर केवळ पुढार्‍यांपुरत्या मर्यादित राहिलेल्या खादीला आता खर्‍या अर्थाने अच्छे दिन येण्यास सुरवात झाली आहे.
खादीचा वापर वाढावा, यासाठी शासकीय पातळीवरही प्रयत्न सुरू झाले असून, आता जागतिक योगादिनी राज्यातील सरकारी अधिकारी कर्मचार्‍यांना खादी सक्तीची केली आहे.

राज्यातील सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनीही खादी वापरावी, अशी सूचना खादी ग्रामोेउद्योगाच्यावतीने करण्यात आले आहे.

खादीचा वापर अधिकाधिक वाढल्यास त्यामुळे खादी उद्योगालाही चालना मिळविण्याचा हेतू आहे. जागतिक योग दिनानिमीत्त जिल्ह्यातील सरकारी अधिकारी कर्मचार्‍यांनी खादीचा टॉप, पायजमा, नॅपकिंग असा ड्रेस कोड लागु करण्यात आला आहे.

गेल्या काही महिण्यापूर्वी जिल्हाप्रशासनाला खादी वापरण्याची सुचना देण्यात आल्या होत्या. यात आठवड्यातून किमान एक दिवस खादीचे कपडे वापरावे, असा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र प्रशासनाचा जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला नाही. सरकारी स्तरापासूनच खादीचा वापर सुरू झाला तर या उद्योगाला उभारी मिळेल. केंद्र व राज्य सरकारचेही देशी उद्योगांना चालना देण्याचे धोरण आहे.

 

LEAVE A REPLY

*