योग दिनानिमित्त उद्या जिल्ह्यात विविध कार्यक्रम

0
धुळे । दि.19 । प्रतिनिधी-शहरात क्रीडा भारती संघटनेच्या पुढाकाराने विश्व योगदिन संयोजन समिती आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने उद्या दि. 21 जून रोजी योग दिन साजरा करण्यात येणार आहे.
सकाळी 6.45 वाजेपासून ते 8.15 वाजेपर्यंत विविध व्यायाम व आसने, ध्यान, संकल्प, शांतिपाठ, सूर्यनमस्कार केले जाणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे, पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल, महापौर, सौ.कल्पना महाले, आ.अनिल गोटे, आ.कुणाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाधरन, मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विद्यार्थ्यांची उपस्थित राहणार आहेत.
उपस्थितीचे आवाहन स्वागताध्यक्ष चंद्रकांत केले, साहेबचंद जैन, रवी बेलपाठक, प्रा.भिकाजी भिमाजी बोरसे ओमप्रकाश खंडेलवाल, संदीप बेडसे, अनुप अग्रवाल, डिवायएसपी हिंमतराव जाधव डी.वायएसपी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, राजेश वाणी, संतोष मुन्नोशठ अग्रवाल सुधाकर बेंद्रे, जितेंद्र भामरे, भालचंद्र नेरपगार आदिंनी केले आहे.

भारत स्वाभीमान न्यास- तृतीय आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2017 रोजी योग संस्था पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान न्याससह पाचही संघटना शाखा धुळे यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम राज्य राखीव बलगट क्र.6 यांच्या सहकार्याने एसआरपीच्या मैदानावर साजरा करणार आहे.

हा कार्यक्रम 21 जून रोजी सकाळी 7 ते 8.30 या वेळात होणार आहे. विद्यार्थी, राज्य राखीव पोलीस दलाच्या उच्च अधिकार्‍यांसह, जवानही उपस्थित राहणार आहेत.

भारतातील सर्वोच्च योग संस्था व योगतज्ञांनी खास जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी कोणते पुरक व्यायाम, प्राणायाम व ध्यानाचा अभ्यास करावा याचा शासनमान्य अभ्यासक्रम (प्रोटोकॉल) तयार केलेला आहे.

हा योगाचा अभ्यास कोणीही केला तरी त्याला नेहमीच व्याधीमुक्त निरोगी व निराम जीवन जगता येईल. हा योगाभ्यास योगदिनाच्या कार्यक्रमानिमित्त नि:शुल्क व नि:स्वार्थ भावनेने सगळ्यांना शिकवला जाणार आहे.

त्यासाठी आंतरराष्ट्रीय योग व्यावसायिक, आयएसओ मानांकन प्राप्त व केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाचे मान्यता प्राप्त योग शिक्षकांसह पतंजलीचे योग शिक्षक जनतेला मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वतः एस.आर.पी. कमाडंट चंद्रकांत गवळी, पतंजली समितीचे जिल्हा प्रभारी अ‍ॅड.राजेंद्र निकुंभ, भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हा प्रभारी प्रितमसिंह ठाकुर, महिला पंतजली जिल्हा प्रभारी रचना शिंदे, किसान किसन प्रभारी योगेश भामरे, महामंत्री पुष्पा ठाकुर, कोषाध्यक्ष अरुण विभांडिक, योग शिक्षक मोतीसिंह ठाकुर, प्रा.एस.टी. चौधरी, चारुहास मोराणकर, प्रकाश जोशी, मुरलीधर पांडे, शामराव ठाकरे, शांताराम पाटील, प्रफुल्ल देशमुख, बी.आर.पवार, संध्या पाटील, श्रीमती राजपूत, श्रीमती उषाताई साळुंखे, भगवान पवार, परमेश्वर वर्मा आदी परिश्रम घेत आहेत. नागरिकांनी कार्यक्रमस्थळी सकाळी 6.30 वाजता उपस्थित रहावे.

 

LEAVE A REPLY

*