धुळ्यात अडीच लाखांचा दारुसाठा जप्त

0
धुळे । दि.27 । प्रतिनिधी-मारुती व्हॅनमधून दोन लाख 33 हजार रुपयांचा अवैध दारुसाठा चाळीसगाव रोड पोलिसांनी जप्त केला. आज दि. 27 रोजी चाळीसगाव चौफुलीवर ही कारवाई करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र बी. सपकाळ यांना डीवायएसपींच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अवैध दारुसाठ्याची मारुती व्हॅनमधून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार जितेंद्र सपकाळ यांनी त्यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी असई राजेश इंदवे, पोकॉ प्रेमराज पाटील, शंकर महाजन, जोएब पठाण, संदीप कढरे यांच्यासह चाळीसगाव रोडवरील सुर्या जीनजवळ सकाळी 12.30 वाजेच्या सुमारास एमएच18 डब्ल्यु 3732 या क्रमांकाची मारुती व्हॅन थांबविली. वाहनाची तपासणी केली असता राकेश विठ्ठल मराठे रा. मोहाडी याच्याकडून माहिती घेतली.

मराठे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार व्हॅनमध्ये विविध प्रकारच्या दारुचे 96 नग आढळून आले. सदरची दारु 23 हजार 802 रुपये व इतर दारुचे दोन लाख 10 हजार रुपये किंमतीचा ऐवज मारुती व्हॅनसह जप्त करण्यात आला.

प्रेमराज निकम यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

 

LEAVE A REPLY

*