पावसाळ्यात 14 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

0
धुळे । दि.27 । प्रतिनिधी-जिल्ह्यात ऐन पारवसाळ्यात तब्बल 14 गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जून महिना संपत आला तरी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने अद्यापही अनेक गावांमध्ये नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
7 जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली असून जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. सुरुवातीला जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती.

परंतू त्यानंतर पावसाने दांडी मारली. त्यामुळे विहीरींची पातळी वाढली नाही. तलाव व धरणांचा साठाही वाढला नाही. त्यामुळे एकीकडे पावसाची प्रतिक्षा तर दुसरीकडे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटंकीत सुरू आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील तांडा, कुंडाणे, पेरेजपूर, सालटेक, कढरे, हट्टी बुद्रूक, वारुड, पथारे, दत्ताने, अजंदे, भडणे, मेलाणे, विटाई, चांदगड, खुडाणे, वरुड घुसरे, डांबली, धांदरणे, कामपूर अशा 14 गावांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या सर्व गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

*