Type to search

धुळे

व्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी

Share

धुळे । शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्यस्त्रोत असलेल्या तापी योजनेच्या जलवाहिनीला असलेल्या व्हॉल्व्हला वरखेडी रोडवर गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याची टंचाई काळात नासाडी होत आहे. परंतु याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तापी पाणीपुरवठा योजना मुख्यस्त्रोत आहे. शहरातील 70 टक्के भागात या योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. परंतु या योजनेची जलवाहिनी जीर्ण झाली आहे. त्यामुळे जलवाहिनी व व्हॉल्व्ह फुटतो. तर काही ठिकाणी जलवाहिनी फोडण्यात येते. यामुळे जलवाहिनीतून नेहमीच पाण्याची नासाडी होते.

शहरातील वरखेडी रोडवरुन तापी योजनेची जलवाहिनी गेली आहे. या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली आहे. या गळतीतून 15 ते 20 फूट पाणी वाहत आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. परंतु याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ऐन टंचाईच्या काळात पाण्याची नासाडी होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!