Type to search

Breaking News Featured धुळे मुख्य बातम्या

Video : धुळे : वाघाडीजवळ केमिकल फॅक्टरीत स्फोट; वाघाडी गाव केले खाली

Share

धुळे | प्रतिनिधी 

शिरपूर येथे एका केमिकल फॅक्टरीत आज सकाळी भीषण स्फोट झाला. फॅक्टरीतील बॉयलरचा स्फोट होऊन यात दहा जण जागीच ठार झाले आहेत. तर या दुर्घटनेत ४० पेक्षा अधिक कामगार जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृतांमध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. स्फोट एवढा भीषण होता की, दोन किलोमीटरपर्यंत जमीन हादरली. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

या फॅक्टरीत सहा बॉयलर असून आतापर्यंत चार बॉयलरचे स्फोट झाले आहेत. सुरक्षेच्या कारणाने आसपारच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.

घटना घडल्यानंतर काही वेळातच शिरपूर अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या. मात्र ही आग मोठी असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करूनही ही आग आटोक्यात आलेली नाही.

आगीवर लवकर नियंत्रण मिळता यावे यासाठी शिरपूरबाहेरील अग्निशमन केंद्रांच्या आणखी गाड्या मागवण्यात आल्या आहेत. या केमिकल फॅक्टरीमध्ये असलेल्या बॉयलरचे सतत स्फोट होत असल्याने ही आग नियंत्रणात आणणे कठीण होऊन बसले आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

या भीषण स्फोटात आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींचा आकडा ४० इतका सांगण्यात येत आहे.

 

खबरदारीचे उपाय म्हणून वाघाडी गाव केले खाली

केमिकल फॅक्टरीत झालेल्या भीषण स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या फॅक्टरीत स्फोट झाला ती केमीकलची असल्याने त्यात जमीनीखाली असलेल्या टक्यांचाही स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून वागाडी गाव खाली केली आहे.

रक्तदान करण्याचे आवाहन

वाघाडी येथील केमिकल फॅक्टरी मध्ये झालेल्या भीषण स्फोटात काही लोक मुत्यूमुखी पडलेत तर काही गंभीर जखमी आहेत. अशा गंभीर व्यक्तींना रक्ताची नितांत गरज आहे. तरी सर्व कर्मचारी बंधूंना तसेच विद्यार्थी, रक्तदाते यांना रक्तदान करण्याची विनंती केली करण्यात आली आहे. रक्तदात्यांनी उपजिल्हा रुग्णालय व इंदिरा मेमो. हॉस्पिटल, शिरपूर येथे जाऊन रक्तदान करून सहकार्य करावे.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!