Type to search

Breaking News धुळे

वाडी-शेवाडी प्रकल्पातील उजव्या कालव्याची दुरुस्ती करा !

Share

धुळे  – 

वाडी-शेवाडी प्रकल्पातील उजव्या कालव्याची दुरुस्ती करावी व सदर कालव्यात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी अमराळे, तामथरे, मुकटी, चिमठावळ ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वाडी-शेवाडी प्रकल्प शंभर टक्के भरला असून रामी ता. धुळे या गावाच्या शेतकर्‍यांची उजव्या कालव्यावर शेती पाण्याखाली गेली असून त्यांच्या शेतीचा मोबदला न मिळाल्यामुळे तेथील शेतकरी कालव्याचे काम होवू देत नाहीत.

त्यांचा मोबदला देवून कालव्याचे काम पुर्ण करावे. कालव्याचे काम पुर्ण तर सदर वाडी प्रकल्पातील पाणी नदी पात्रात सोडल्यामुळे पाणी वाया जात आहे. हे पाणी जर उजव्या कालव्याद्वारे सोडण्यात आले तर परिसरातील दोन उपनद्या सामा व तवल्या हे जिवंत होतील. पाण्याची खालावलेली पातळी वर येईल. उजव्या कालवा क्षेत्रात येणारी गावे अमराळे, तामथरे, मुकटी, चिमठावळ हे आहेत. या कालव्याच्या पाण्यामुळे या परिसराला फायदा होईल.

या अगोदरही सप्टेबर महिन्यात निवेदन देण्यात आले होते. पण त्याची दखल घेण्यात आलेली नाही. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर विरेंद्रसिंग गिरासे, लोटन बोरसे, अनिल बोरसे, योगेश बोरसे, राजेंद्र बोरसे, प्रफुल्ल बोरसे, मच्छींद्र गिरासे, जयपाल गिरासे, मनोहर बोरसे, जगन्नाथ बोरसे, अनिल बोरसे, समाधान बोरसे, डी.आर.बोरसे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!