मते मिळत नाहीत….‘त्या’ गल्लीत विकासकामे करणार नाही !

0
धुळे । दि.15 । प्रतिनिधी-गल्लीतील मतदारांनी माझ्या पत्नीला मतदान केलेले नाही. त्यामुळे त्या गल्लीत कोणत्याही प्रकारची विकासकामे केली जाणार नाहीत.
याबाबत कोणाकडेही तक्रार करा, त्याला मी घाबरत नाही, असा निर्वाणीचा इशारा प्रभाग क्र.32 अ च्या नगरसेविका माधुरी अजळकर यांचे पती श्री.अजळकर यांनी महिलांच्या शिष्टमंडळाला दिला.
शहरातील प्रभाग क्र.32 अ मध्ये नगरोत्थान निधीतून रस्ते व गटारीची कामे सुरु आहेत. या अंतर्गत सत्य साईबाबा कॉलनी आणि लक्ष्मीनारायणनगर या ठिकाणी रस्त्याची कामे केली जात आहेत, परंतु या कामांमध्ये नगरसेविका दुजाभाव करीत आहेत.

लक्ष्मीनारायणनगर रस्ता ते कल्याणी नगरपर्यंत असलेल्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

या रस्त्यावर पायी चालणेदेखील अवघड झाले आहे. रोज एकतरी वाहनधारक रस्त्याच्या दूरवस्थेमुळे खाली पडतो. हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा म्हणून नगरसेविका माधुरी अजळकर यांचे पती श्री.अजळकर यांना भेटण्यासाठी महिलांचे शिष्टमंडळ काल गेले होते.

त्यावेळी श्री.अजळकर यांनी महिला शिष्टमंडळाला समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्या गल्लीतून मते मिळालेली नाहीत, मग विकासकामे त्या गल्लीत का करायची? असा प्रश्न त्यांनी महिला शिष्टमंडळाला केला.

मी त्या गल्लीत रस्ताही करणार नाही आणि गटारीही करणार नाही. माझी तक्रार कोणाजवळही करा, असेही त्यांनी महिला शिष्टमंडळाला सांगितले.

सौ.अजळकर यांना नगरसेविका म्हणून निवडून येवून साडेतीन वर्ष उलटले तरीदेखील त्या प्रभागात फिरकलेल्या नाहीत. हा प्रभाग शहरापासून लांब आहे.

या प्रभागात रस्ते, गटारी, पथदिव्यांच्या समस्या कायम आहेत. या प्रभागातील नागरिक नेहमी कर भरतात, परंतु या प्रभागातील समस्या सुटलेल्या नाहीत.

 

 

LEAVE A REPLY

*