Type to search

मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी व्होटर सर्च अ‍ॅप

maharashtra धुळे

मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी व्होटर सर्च अ‍ॅप

Share
धुळे । मतदार यादीतील नाव, पत्ता, यादी भाग क्रमांक, मतदान केंद्र आदींचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्होटर सर्च अँड्राइड मोबाईल अ‍ॅप कार्यान्वित करण्यात आले असून ते गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम प्रसिध्द झाला असून धुळे लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने मतदारांना त्यांचे मतदार यादीत नाव, पत्ता, यादी भाग क्रमांक, मतदान केंद्र क्रमांक आदींचा शोध घेण्यासाठी अ‍ॅप लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच मतदार हे क्यूआर कोड स्कॅन करुन देखील हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करू शकतात.

सदरचे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर त्यात पर्यायांचा वापर करून त्याचे मतदार यादीत नाव, पत्ता, यादी भाग क्रमांक, मतदान केंद्र क्रमांक आदी शोधू शकतात. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी गुगल प्ले स्टोअरमधून वरील प डाऊनलोड करुन आपले नाव, मतदान केंद्राचा पत्ता, मतदान केंद्र क्रमांक, यादी भाग क्रमांक आदी शोधण्याकामी अ‍ॅप्लिकेशनचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!