तिसगाव-ढंढाणे येथे तरुण शेतकर्‍याची आत्महत्त्या

0
कापडणे । तिसगाव ढंढाणे येथे तरुण शेतकर्‍याने आज (दि.13) विषप्राशन करुन आत्महत्त्या केली. प्रदीप दगा पाटील (वय 37) असे या तरुण शेतकर्‍याचे नाव आहे. सातत्याने पाच वर्षांपासून असलेली दुष्काळी परिस्थिती, बँकेचे कृषी कर्ज तसेच सावकारी कर्ज या विवंचनेतून ही आत्महत्त्या केल्याचे समजते.

आज (दि.13) दुपारी 2 वाजेच्या सुमारास आपल्या शेतात जाऊन त्यांनी विषारी औषध प्राशन केले. तत्पूर्वी मयत प्रदीपने आपला भाऊ नाना फोन केला. त्यास मी खूप टेन्शनमध्ये आहे, हताश झालो आहे, असे सांगत तुम्हाला सोडून खूप लांब जात आहे, परिवाराची काळजी घे, असे बोलणे करुन या तरुण शेतकर्‍याने आपले जीवन संपवले. एकीकडे पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आणि त्यात हा कर्जाचा डोंगर ही सर्वपरिस्थिती या युवा शेतकर्‍यास हतबल करुन गेली. फोनवरील निर्वाणीचे बोलणे ऐकून भाऊ नाना हा घाबरला आणि सर्वमाहिती त्यांनी घरातील मंडळींना दिली. घरातील सर्वमंडळी प्रदीप पाटीलच्या शोधात निघाल्यानंतर प्रदीप आपल्या शेतात बेशुद्धावस्थेत सापडला. सुमारे 4 वाजेपर्यंत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, लहान भाऊ असा परिवार आहे. कर्जाच्या विवंचनेतून आपली जीवनयात्रा संपविणार्‍या प्रदीप पाटीलच्या एक्झीटने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*