Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedधुळे : चोरट्यांचा पोलिसाच्या घरावर डल्ला

धुळे : चोरट्यांचा पोलिसाच्या घरावर डल्ला

धुळे  – 

शहरातील चितोड उपनगरातील रेणुका नगरात चोरट्यांनी पोलिसांच्या घरांनाच लक्ष केले. निवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाकडे धाडसी घरफोडी करून 40 हजारांची रोकड लंपास केली. तर पोलिस कर्मचार्‍यासह दोघांकडे चोरीचा प्रयत्न केला. याप्रकरणी शहर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरट्यांची पोलिसाचे घर फोडून पोलिसांना तपासाचे आव्हान दिले आहे.

- Advertisement -

चितोड उपनगरातील रेणूका नगरात प्लॉट क्र. 28 मध्ये राहणारे एएसआय माधव दत्तात्रय जाधव हे कुटुंबियांसह घराच्या गच्चीवर झोपले होते. त्यामुळे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोंयडा तोडून घरात प्रवेश केला. जाधव यांनी शेती बियाण्यासाठी 40 हजार रुपये कपाटात ठेवले होते. तेच पैसे कपाट फोडल्यावर चोरट्यांच्या हाती लागले.

तसेच पेन्शनची कागदपत्रे चोरून नेली. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा जवळील प्लॉट नं. 12 व 13 कडे वळविला. तेथे पोलिस मुख्यालयात बँड पथकाचे हे.कॉ. दिनेश ओंकार गुरव यांचे घर फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र त्यांच्या घराचा लाकडी दरवाजा चोरटे तोडू शकले नाहीत. त्यामुळे चोरट्यांनी अंगणात उभ्या दुचाकीतून पेट्रोल चोरण्याचा प्रयत्न केला.

चोरीची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. एस. काळे, उपनिरीक्षक विजया पवार, श्वान पथकाचे पी. एन. परदेशी, जे. बी. मगळे, के. एम. परदेशी आदींनी घटनास्थळी भेट दिली. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या