Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedशिरपूर गोल्ड रिफायनरीमध्ये चोरी

शिरपूर गोल्ड रिफायनरीमध्ये चोरी

शिरपूर – 

शिरपूर तालुक्यातील दहिवद शिवारात शिरपूर गोल्ड रिफायनरी लिमीटेड कंपनीत अज्ञात चोरट्यांनी 10 एप्रिल रात्री 10 ते 11 एप्रिल पहाटे 3:30 च्या दरम्यान सुमारे 1 लाख 44 हजार पाचशे रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दि.11 एप्रिल दुपारी उघड झाली आहे. यासंदर्भात काल मॅनेजर योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

दि.18 मार्चपासुन शासनाच्या आदेशाने कंपनीचे कार्यालयीन कामकाज बंद ठवले आहे. परंतु कंपनीच्या आवारात सुरक्षा पुरवली जाते. दि 11 रोजी दुपारी 3 ते 3:45 वाजेच्या सुमारास कंपनीचे सुरक्षा रक्षक रामसिंग राजपूत यांच्या जनरेटर चालु होत नसल्याची बाब लक्षात आली. तेथे जवळ बघितले असता जनरेटरच्या बॅटरी आढळून आल्या नाहीत. प्रथम दर्शनी ही चोरी असल्याचे लक्षात येता त्यांनी व्यवस्थापकांना कळविले. त्यानंतर व्यवस्थापक सिसोदिया यांनी कंपनीचे शिपाई व लेखपाल यांना सोबत घेवून पाहणी केली.

कंपनीतील 66 हजार किंमतीचे पब्लीक कंपनीचे कॉपर वायरचे 3 बंडल, 36 हजार किंमतीचे एकुण 6 कॉपर प्लेटस प्रती प्लेट, 24 हजार किंमतीचे एक्साईड कंपनीच्या हायवे ड्युटीच्या तिन बॅटरी, 12 हजार पाचशे किंमतीचे 1 एचपी कंपनीचा कप्युटर, 6 हजार किंमतीचे प्रिंटर असा एकुण 1 लाख 44 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याबद्दल काल थाळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय एन.ए. रसल करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या