धुळ्याचे तापमान पुन्हा 42.4 अंशावर

पाच वाजेनंतर ढगाळ वातावरण, उकाडा मात्र कायम

0
धुळे । धुळ्याच्या तापमानाचा पारा पुन्हा 42.4 अंशावर गेल्याची नोंद कृषी महाविद्यालयात करण्यात आली आहे. तापमान 42.4 अंशावर गेल्यामुळे अंगाची लाहीलाही होत असून अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. परंतु सायंकाळी 5 वाजेनंतर ढगाळ वातावरण झाले पण उकाडा मात्र जाणवतच होता.

यंदा मार्च महिन्यात मे हिटचा तडाखा धुळेकरांनी अनुभवला. तापमानाचा पारा चाळीशीच्या पुढे पोहचला होता. एक-दोन अंश तापमान खाली-वर होत आहे. आज 42.4 अंश तापमानाची नोंद कृषी महाविद्यालयात करण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरीक त्यांचे व्यवहार सकाळी 10 वाजेच्या आत उरकवून घेत आहेत. मुख्य बाजारपेठेत देखील दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसून येत आहे. वाढत्या तापमानाचा तडाखा बसत असल्यामुळे अनेकांना जुलाब, उलटी, पोटदुखीचा त्रास होत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

*