शिक्षक समन्वय समितीचा मोर्चा

0
धुळे । दि.17 । प्रतिनिधी-महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे, शिक्षणाचे व विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत.
सदर प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमि शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शासनाशी अनेकवेळा समक्ष चर्चा केली.
पत्रव्यवहार केला. मात्र आश्वासनाशिवाय काही ठोस निर्णय झाले नाहीत. करीता शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरीता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.17 जून 2017 रोजी दुपारी 1 ते 5 या वेळेत मोर्चा काढण्यात आला आहे.

तरी खालील प्रश्नाची शासनाने दखल घेऊन तातडीने प्रश्न सोडविण्याबाबत निर्णायक भूमिका घ्यावी ही विनंती. अन्यथा या पुढील काळात प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीस तिव्र आंदोलन छेडावे लागेल.

स्थानिक स्वराज्य संस्थारंच्या शाळेतील 100 टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा. शाळांच्या विद्युत बिलाची तरतुद करून ऑनलाईन करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात.

27 फेब्रुवारी 2017 च्या बदली विषयक शासन निर्णयात समन्वय समितीच्या वतीने सुचविलेल्या प्रमाणे बदल करण्यात यावा व 15 जून पासून शाळा सुरु झाल्याने विद्यार्थी हितास्तव या निर्णयाची अंमलबजावणी यावर्षी करु नये.
1 नोव्हेंबर 2005 नंतरचे शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, संगणक प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2017 पर्यंत मुदत वाढ द्यावी.

पटसंख्येची अट न ठेवता अंशनिर्देशकाची पदे प्रत्येक शाळेत भरण्यात यावी. पती पत्नी व एकत्र शिक्षकांना, समान न्याय मिळणे. धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने दि.17 जून रोजी शनिवारी 10 वाजता कल्याण भवन येथून भव्य मोर्चा काढण्यात आला.

 

 

LEAVE A REPLY

*