Type to search

धुळे

बाल कामगारांच्या संख्येत दुष्काळामुळे वाढ

Share

महेंद्र खोंडे
तर्‍हाडी । ‘बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा…’ या काव्यातून बालपणाच्या गोडव्याची जाण होते.परंतु दुष्काळी परिस्थितीने प्रत्येक वर्षाला प्रौढांसह बालकामगारांमध्ये मोठी भर पडत आहे. बालकामगारांना न्याय देणारी कायद्याची नियमावली अनेक लहान-मोठया व्यवसायीकांनी वेशीला लटकिल्याने बाल कामगार कायदा खिळखिळा केल्याचे अनेक ठिकाणी दिसणार्‍या दृश्यावरून सिध्द होते.

9 ते 14 वर्षे वयोगटातील बालमजुरांची बालकामगार म्हणून नोंद केली जाते. शहरासह ग्रामीण भागातही हॉटेल, किराणा दुकान, रसवंतीगृह आशा विविध प्रकारच्या असस्थापनांवर बालकामगार प्रकर्षाने दिसतात. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मदत म्हणून बहुदा बालकामगारांना मजुरीचे काम करावे लागते हे विदारक सत्य आहे. मात्र यामुळे त्यांच्याकडून बालपण हिराऊन घेतले जात आहे. शासनाने 9 ते 14 वयोगटातील बालकांसाठी कायदा आंमलात आणला. बाल कामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्यावतीने विविध जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कामगार प्रकल्प राबविण्यात येतात. यामध्ये धोकादायक कामे करणार्‍या बालकामगारांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणले जाते. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश बालकामगारांना त्यांच्या कामपासुन प्रावृत्त करून शिक्षणाचे महत्व सांगणे हा आहे. परंतु बहुतांश व्यावसायीकांकडे बाल मजुरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.कमी पैशा मध्ये मजुर मिळण्यासाठी बालकामगारांना कामावर ठेवले जाते. परंतु कायद्याने हा गुन्हा असतांना सुध्दा अनेक शासकिय कार्यालयामध्येच बालकामगारा मार्फत चहा, फराळ पोहचवण्याचे काम खुलेआम होत आहे.

ग्रामीण भागात शाळा, अंगणवाड्यांमध्ये बालकांसाठी विविध पोषण आहाराच्या योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश अंगणवाड्या या दळभद्री कारभारा मुळे बालकांचे बालपणच करपविले जात आहे. यावर प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!