धुळे तालुका कुणबी सेनेच्या प्रसिद्धी प्रमुखपदी ललित पाटील

0
धुळे । धुळे तालुका कुणबी सेनेच्या तालुका प्रसिध्दी प्रमुखपदी शिरुड येथील ललित पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीबाबत तालुका प्रमुख निलेश प्रल्हाद बोरसे यांनी ललित पाटील यांना नुकतेच पत्र दिले आहे.

शेतकर्‍यांच्या हितार्थ, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात कामे व विद्यार्थ्यांच्या विविध व्यक्तीमत्व विकास साधण्यासाठी ललित पाटील यांचे ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरु असून पर्यावरणाबाबत समाजात जागृती करणे अशा माध्यमातून लोकोपयोगी कामात कार्यरत असलेल्या पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांची प्रसिध्दी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ललित पाटील हे शिरुड येथील के.व्ही.पाटील यांचे चिरंजीव आहेत.

ललित पाटील यांच्या नियुक्तीबाबत कुणबी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवराज पाटील, कुणबी सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप देवरे, गजानन नारायण पाटील, माजी जि.प.सदस्य विजय गजानन पाटील, माजी पं.स. सभापती गुलाबराव कोतेकर, साहेबराव दामू खैरनार, कुणबी सेना तालुका प्रमुख निलेश प्रल्हाद बोरसे, माजी पं.स. सदस्य नाना शामजी पाटील, माजी उपसरपंच विलासराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य दीपक जिजाबराव पाटील, सावंतराव पाटील, दादाभाऊ बिराडे, भैय्यासाहेब सोनवणे, शिवाजी बोरसे, प्रल्हाद बोरसे, आबा शिंदे, हरी दामू पाटील आदींनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

*