तर्‍हाडी येथे विद्यार्थ्यांना कपडे वाटप

0
तर्‍हाडी । दि.28 । वार्ताहर-येथील सोमा पाटील विद्यालयात लोकसहभागातून येथील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना तर्‍हाडी येथील माजी विद्यार्थी युवराज जाधव यांनी 100 डझन वह्यांचे मोफत वाटप केले.
यावेळी स्वाभिमान प्रतिष्ठाण शिरपूर, गावकरी फाऊंडेशन, यशलिला सेवाभावी संस्था, हाजी पेन्स अर्थे, वास्तु निर्मिती कन्ट्रक्शन, गणेश कोवर, एम.डी. बाफना ट्रेडर्स यांनी 25 हजार किमतीचे गणवेश वाटप केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शैक्षणिक साहित्य व गणवेश यामुळे मध्येच शिक्षण सोडणार्‍या विद्यार्थ्यांना मदत होईल व त्यांचे शिक्षण पुढे चालू राहील.

हा उद्देश या कार्यक्रमाचा आहे, असे मत माजी विद्यार्थी युवराज जाधव व स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय बाफना यांनी विचार व्यक्त केले.

त्यावेळी एस.कुमार, रमेश बाफना, रवी पाटील, संस्थेचे अध्यक्ष सुधीर भामरे, सुभाष भामरे, उज्वला भामरे, मुख्याध्यापक एन.एच.कश्यप, ए.एम.सोनवणे, डी.बी. पाटील, आर.एस. चव्हाण, ए.के. पाटील, भरत मराठे सर्व शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना साहित्य मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

 

LEAVE A REPLY

*