Type to search

धुळे फिचर्स

खा.सुळे यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम

Share

धुळे

खा.सुप्रिया सुळे या आज 28 रोजी धुळे दौर्‍यावर येत आहेत. यादरम्यान त्या शहरातील विकास कामांची पाहणी करतील.
जळगाव येथील नियोजित कार्यक्रम आटोपून सायंकाळी 4 वा. खा.सुळे धुळ्यात पोहचतील.

सायंकाळी 4.15 वाजता छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीला हजेरी लावतील. 5.30 वा. नियोजित सफारी गार्डची पाहणी, 6 वाजता शिवतिर्थ येथे आगमन अग्रसेन स्मारक, गुरु-शिष्य स्मारक, परमविरचक्र अब्दुल हमीद स्मारकास अभिवादन करतील 6.30 वाजता गुरु-शिष्य स्मारकास भेट, त्यानंतर त्या पांझरा लगतच्या भगवान शंकर स्मारकाची आणि झुलत्या पुलाच्या कामाची पाहणी करतील.

तसेच सायंकाळी 7.15 ला जिल्हा ग्रंथालयात आगमन, 8 वाजता याचठिकाणी पत्रपरिषद, त्यानंतर त्या चाळीसगावकडे रवाना होतील. असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी कळविले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!