Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसौंदाणेत एकाची आत्महत्या,१६ जणांवर गुन्हा

सौंदाणेत एकाची आत्महत्या,१६ जणांवर गुन्हा

धुळे  –

तालुक्यातील सौंदाणे येथे एकाने सततच्या त्रासाला कंटाळून गावातील पाण्याच्या टाकीच्या लोखंडी शिडीला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल पहाटेच्या सुमारास घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 16 जणांविरूध्द मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

विजय वसंत पाटील (वय 55 रा. सौंदाणे ता. धुळे) असे मयताचे नाव आहे. त्याचा मुलगा गोपाल पाटील (वय 23) याने मोहाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयत विजय पाटील यांची सौंदाणे गावातील फागणे रोड लगत शेतगट नंबर 53-2 क्षेत्र 2 हे. 23 आर शेती होती. या शेतातील 65 आर क्षेत्रात प्लॉट पाडून एन.ए. करुन ते प्लॉट त्यांनी विक्री करीत होते.

त्यातील प्लॉट नंबर 20 हा हेमंत एकनाथ पाटील याला विकला. हा व्यवहार संतोष एकनाथ पाटील, एकनाथ गंगाराम पाटील, निलाबाई एकनाथ पाटील, योगेश हिरालाल पाटील यांच्या समक्ष केला होता. हेमंत पाटील याने त्यावेळी प्लॉटचे पैसे दिले नाही. त्यामुळे ते पैसे मागण्यासाठी विजय पाटील हे जात होते. तेव्हा त्यांना वादावादी करीत शिवीगाळ करुन दमदाटी करीत. त्यातून त्यांना टेंन्शन आले होते.

तसेच मच्छींद्र किसन पाटील, प्रशांत मच्छींद्र पाटील, जितेंद्र मंच्छींद्र पाटील व राजेंद्र किसन पाटील यांनी संगनमत करुन सामाईक शेतीची हद्द खून उपटून बांध देखील ट्रॅकटरने नांगरुन टाकला. तेव्हा विजय पाटील हे समजावून सांगण्यास गेले. तेव्हा देखील त्यांना लोखंडी सळईने मारहाण करुन शिवीगाळ करीत धमकावले.

त्यानंतर त्यांनी गावातील लोकांच्यामार्फत समजावण्याचा प्रत्यत्न केला. मात्र त्याचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्रासाला कंटाळून दि. 7 रोजी पहाटे 5 वाजेपुर्वी विजय पाटील यांनी गावातील पाण्याच्या टाकीच्या लोंखडी सीडीला गळफास घेवून घेवून आत्महत्या केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या