हिरे रुग्णालयात रक्त विघटन केंद्र मंजूर

0
धुळे । दि.2 । प्रतिनिधी-भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे सर्वासोयीनियुक्त व सर्व यंत्रसामुग्रानी सुसज्ज अशी मॉडेल रक्तपेढी सुरु करण्यात येत असून एम.डी. व एम.एस.हे पदव्युत्तर अभासक्रम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

या रक्तपेढीत रक्ताचे विविध घटक गरीब व गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्याची सोय केलेली आहे. यापूर्वी गरीब व गरजू रुग्णांना रक्त घटकांची गरज भासल्यास खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्त व रक्तघटक घेण्यासाठी वेळी अवेळी भटकंती करावी लागत असे.

तसेच आर्थिक भुर्दंडसुध्दा सोसावा लागत असे. आता ही सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कामी ना.डॉ.सुभाष भामरे, संरक्षण राज्यमंत्री यांनी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, यांच्याकडून परवाना मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन रक्त विघटन केंद्र सुरु करण्याची मंजुरी मिळाली आहे.

तसेच रक्त विघटनासाहित रक्त पेढी सुरु झाल्याने भारतीय आयुर्विज्ञान संस्था नवी दिल्ली यांच्या मानांकनानुसार एम.डी. व एम.एस.हे पदव्युत्तर अभासक्रम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

 

LEAVE A REPLY

*