विद्यार्थ्यांनी स्वत:ची क्षमता ओळखावी

0
धुळे । दि.22 । प्रतिनिधी-विद्यार्थ्यांनी स्वत:ची क्षमता ओळखून अभ्यासक्रमाची निवड करावी, असे प्रतिपादन उमविचे बीसीयुडीचे संचालक प्रा.डॉ पी.पी. माहुलीकर यांनी केले.
दहावी, बारावी नंतर काय? यावर मार्गदर्शन शिबीरात प्रा.डॉ पी.पी. माहुलीकर हे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचेे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात हे होते.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंखे, शिव आरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. माधुरी बाफना, निखील सुर्यवंशी, राजेंद्र गर्दे, अतुल पाटील, अ‍ॅड. पंकज गोरे, डॉ.सुशिल महाजन, ऐश्वर्या अग्रवाल, सुनिल बैसाणे व नरेंद्र अहिरे आदि उपस्थित होते.

पुढे बोलतांना प्रा.डॉ. पी.पी. माहुलीकर म्हणाले की, करिअरची निवड करतांना आपला कल कोणत्या क्षेत्राकडे आहे हे ओळखुन करा. पालकांनी पाल्याचे मनोबल ओळखून योग्य ते शिक्षण द्यावे.

आजच्या स्पर्धेत टिकतांना स्वत:च्या क्षमता ओळखा. मिळालेल्या यशामुळे हुरळुन जाऊ नये किंवा कमी गुण मिळाले म्हणुन खचुन जाऊ नये.

परिक्षेतल्या मिळणार्‍या, गुणावरुन जीवनाच्या यशस्वतीचे मापदंड ठरवता येत नाही. आज करिअरच्या अनेक वाटा खुल्या आहेत.

प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. विद्यार्थ्यांनी रोजगाराभिमुख शिक्षणाकडे आपला कल वाढवावा. शिक्षणातुन आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकास साधावा. तसेच, आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या देशाच्या, राष्ट्राच्या विकासासाठी करावा असे आव्हान त्यांनी केले.

आपण निवडलेल्या क्षेत्रात झोकुन देऊन काम करावे. त्यातील अडी अडचणी वर मात करा. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करावे, योगा, सुर्य नमस्कार करुन आपल्या मनाची एकाग्रता वाढविण्याचा त्यांनी प्रयत्न करावा.

ध्येय गाठण्यासाठी एकाग्रता असणे खूप महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी आपली स्वत:ची आवड व क्षमता ओळखुन जर प्रामाणिक प्रयत्न केला तर ध्येय गाठण्यापासुन त्यांना कोणीही थांबवु शकत नाही. असे आवाहन देखील प्रा.डॉ. पी.पी. माहुलीकर यांनी केले.

बबनराव थोरात म्हणाले की, करिअर म्हणजे काय ? तर शिक्षणातून आई-वडिलांना समाधान वाटेल ते शिक्षण म्हणजे करिअर. प्रतिकुल परिस्थितीवर जो मात करतो त्या परिस्थितीतुन जो स्वत:ला घडवतो तो खरा प्रतिभावंत असतो.

आपण घेत असलेले शिक्षण किती दर्जाचे आहे हे महत्वाचे असून आज महानगरपालिका, जिल्हा परिषद शाळेतुन शिक्षण घेणारे विद्यार्थी आयएएस, आयपीएस, डॉक्टर झालेले दिसत आहेत, शिक्षणाचा दर्जा हा आपण किती शिकतो यावर अवलंबुन आहे.

परिस्थितीला बदलण्याचे सामर्थ्य शिक्षणात आहे, विद्यार्थी हा आपले मित्र मैत्रिणी बनवितो, आपल्या आई वडिलांचे न एकता आपला मित्र हा कुठल्या शैक्षणिक क्षेत्राकडे जातील त्या मित्रामागे ते ही त्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होते.

मित्र तिथे प्रवेश घेणार म्हणुन आपण ही त्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा असा अट्टहास न करता आई वडिलांशी संवाद साधुन आपले ध्येय निश्चित करावे आणि त्या दृष्टीने वाटचाल करावी असे त्यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*