अटींमुळे विद्यार्थीनी बससेवे पासून वंचित !

0
शिंदखेडा । दि.20 । प्रतिनिधी-ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना तालूक्याच्या ठिकाणी महाविद्यालयात शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने मानव विकास योजने अंर्तगत मोफत एस.टी.पास सेवा सुरू केली आहे.
गेल्या वर्षापर्यंत कोणतीही अट नसल्याने विद्यार्थीनींना सहजपणे या योजनेचा लाभ घेता येत होता. यासाठी शासनाकडून निळ्या रंगाच्या बसेस देण्यात आल्या आहेत.
परंतू सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षात या योजनेत अनेक अटी टाकल्यामूळे अनेक विद्यार्थीनी या योजनेपासून वंचित रहावे लागत आहे.योजनेतील अटी रद्द करून योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थीनी अकरावी प्रवेशासाठी तालूक्यातील महाविद्यालयात जावे लागते. यासाठी शासनाने पाचवी ते दहावीच्या विद्यार्थीनींसाठी अहिल्यामाता होळकर मोफत एस.टी.पास योजना सुरू केली आहे.

तर अकरावी ते बारावी वर्गात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थीनींसाठी मानव विकास योजनेर्गत मोफत प्रवास पास देण्यात येतो. या योजनेचा लाभ राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थीनी गेल्या 5-6 वर्षापासून देण्यात येत आहे.

सुरवातीला राज्य शासनाने कोणतीही मूलगी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून योजनामध्ये कोणती ही अट टाकण्यात आली नव्हती.

विद्याथींनीना प्रवासासाठी स्वतंत्र निळया रंगाच्या बसेस राज्यातील प्रत्येक आगारात देण्यात आल्या आहेत. यासाठी मोफत पास देण्यात येत होती.

सुरवातीला बसमध्ये मध्ये किती विद्यार्थीनी असाव्यात या बाबत कोणतीही अट नव्हती. शिक्षण विभागाचे अधिकारी, तालूका आगार प्रमूख व मुख्याध्यापक यांच्या बैठकित बसेसचा मार्ग निश्चित करण्यात येत होता.

शिक्षण विभागाने मंजूर केलेल्या विद्यार्थीनींना स्थानिक आगारातूनच पास वितरीत करण्यात येत होते. ग्रामीण भागातील सर्वच लाभार्थी विद्यार्थीनी योजनेचा लाभ मिळत असल्याने पालक देखील समाधानी होते.

मात्र चालू शैक्षणिक वर्षात सरकारने योजनेत अनेक बदल करून एका बस मधून जास्तीत जास्त 120 विद्यार्थीनींंना प्रवास करता येणार आहे.

या योजनेच्या आगारात असलेल्या बसेसची संख्या त्याला गुणीले 120 ही संख्या जी येईल तेवढ्याच संख्येच्या विद्यार्थीनींना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

विद्यार्थीनींची संख्या अधिक असली तर उर्वरीत विद्यार्थीनींना योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच लाभार्थी विद्यार्थीनी ही त्या तालूक्यातील असली पाहिजे आणि तालूक्यातील महाविद्यालयात तिचा प्रवेश असावा.

तालूक्याबाहेरील महाविद्यालयात शिक्षण घेत असल्यास संबंधीत विद्यार्थीनीला योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामूळे योजनेच्या अटी पूर्ण करू न शकणार्‍या विद्याथींनींच्या पालकांना आर्थीक भुर्दंड बसणार आहे.

पालकांना आर्थिक भुर्दंड:- मानव विकास योजने अंर्तगत मोफत पास सेवा लाभार्थी विद्यार्थीनी ह्या अकरावी आणि बारावीत वर्गात शिक्षण घेणा-या आहेत.

योजनेच्या नियमानुसार दोन्ही वर्गातील लाभार्थी विद्यार्थीनींची शिक्षण विभागाने मंजूर केलेली यादी एकाच वेळेस देणे बंधनकारक आहे.

त्याशिवाय लाभार्थीना पास मिळणार नाहित.सद्यस्थितीत राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात 12 वी चे वर्ग सुरू झाले आहेत तर शासन निर्णयानूसार 11 वी प्रवेश प्रक्रीया पूर्ण होणेस जवळपास एक महिन्याचा अवधी आहे.

या स्थितीत फक्त 12 वीच्या लाभार्थी विद्यार्थीनींचीच यादी उपलब्ध होणार आहे. नविन नियमानुसार दोन्ही वर्गांच्या विद्यार्थीनींची संख्या मिळाल्यावरच पासेसचे नियोजन होईल असे मंडळाच्या अधिका-यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे बारावीत शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण भागातील लाभार्थी विद्यार्थीनींना मोफत पासची वाट पाहावी लागणार आहे.परीणामतः या विद्यार्थीनींच्या पालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

शिंदखेडा येथील किसान हायस्कूलमध्ये मानव विकास योजनेची बैठक घेण्यात आली. नविन निकषानुसार तालूक्यातून शिंदखेडा आगारातील उपलब्ध बसेमध्ये 480 विद्यार्थीनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

शहरात पाच कनिष्ठ महाविद्यालय तसेच ग्रामीण भागातून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थीनींची संख्या 700 आहेत त्यामुळे 220 पेक्षा अधिक विद्यार्थीनी या योजनेपासून वंचित राहतील अशी भिती आहे.

यावेळी इयत्ता 8 ते 10च्या वर्गात शिक्षण घेणार्‍या या योजनेतील विद्यार्थीनींना अहिल्याबाई होळकर योजनेत सामाविष्ट करावेत असा निर्णय घेण्यात आला.

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी पी.के.पारधी,सिरसाठ, शिंदखेडा स्थानक प्रमुख के.आर. मगरे,दोंडाईचा स्थानक प्रमुख पी.जी.पाटिल,बी.जी.सोनवणे, मुख्याध्यापक पवार उपस्थित होते.

या 11वीच्या लाभार्थी विद्यार्थीनीची अंतीम यादी तयार होणेस जवळपास एक महिन्याचा कालावधी असल्याने 12वी वर्गातील लाभार्थी विद्यार्थीनींना वेठीस न धरता त्यांना पास तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पालकांनी केली आहे.

तालूक्यातील जूने मार्ग:-दोंडाईचा-मांडळ-खर्दे-अंजनविहिरे-देवी-रेवाडी,दोडाईचा-मालपूर-सूराय-चूडाणे-अक्कलकोट,दोंडाईचा-दाऊळ-मंदाणे-शेंदवाडे-साहूर, हे तीन मार्ग दोडाईचा भागासाठी आहेत.शिंदखेडा-कूमरेज-परसामळ-भडणे-हातनूर-साळवे-चिमठाणे, शिंदखेडा-चिमठाणे-अमराळे-तामथरे-सवाई मुकटी-सोंडले, शिंदखेडा-चिमठाणे-आरावे-जखाणे-शेवाडे-वाडी.,शिंदखेडा-होळ-नरडाणा-वारूड-पाष्टे-म्हळसर-मुडावद.

नविन प्रस्तावित मार्ग:-शिंदखेडा-चिरणे-बाभुळदे-महाळपूर-निशाने-खलाणे-वायपूर;शिंदखेडा-अमळथे-सोनेवाडी-वरसूस-कुमरेज-हातनूर-साळवे-चिमठाणे;शिंदखेडा-परसामळ-महाळपूर-दलवाडे-दराणे-सवाईमुकटी-डांगुर्णे;शिंदखेडा-अलाणे-दरखेडा-आरावे-जखाणे-वाडी;शिंदखेडा-विरदेल-चिलाणे-धमाणे-बाम्हणे; शिंदखेडा-अमळथा-वरपाडा-सोनेवाडी-नेवाडे-अक्कडसे;शिंदखेडा-वर्षी-कमखेडा-हुंबर्डे-विकवेल;शिंदखेडा-पाटण-नवे सूकवद-जूनेसूकवद-तावखेडा-गिधाडे-खर्दे-बाभूळदे-सावळदे;शिंदखेडा-दसवेल-होळ-धांदरणे-विटाई-गोराणे-माळीच ह्या मार्गाची मान्यता विभागीय नियंत्रकांकडून घ्यावी लागणार आहे.

 

LEAVE A REPLY

*