एसएसव्हीपीएस स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी राज्यात प्रथम

0
धुळे । दि.29 । प्रतिनिधी-कला संचालनालय तर्फे घेण्यात आलेल्या शासकीय उच्च कला परीक्षा 2017 टेक्सटाईल विभागाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून एसएसव्हीपीएस स्कुल ऑफ आर्टचा निकाल 100 लागला आहे.

तरी राज्यातून प्रथम येण्याचा मान विव्हींग विभागाचा विद्यार्थी मनोज भगवान जाधव या विद्यार्थ्याने मिळवला असून बापूजी दगडू अहिरे, द्वितीय व गणेश रुपचंद पाटील तृतीय आले आहेत आणि प्रिटींग व डाईंग या विभागातून विकास सरदारसिंह राजपूत व निखील संजय महाजन संयुक्त प्रथम, किरण अशोक चौधरी द्वितीय, गौरव राजेंद्र दीक्षित तृतीय हे विद्यार्थी महाविद्यालयातून उत्तीर्ण झाले असून सर्व उर्त्तीण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, चेअरमन आ.कुणाल पाटील, सचिव भैय्यासाहेब उत्कर्ष पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रमोद पाटील, प्राचार्य प्रा.सुनिल तांबे यांनी कौतूक केले.

तर प्रा.अनिल वाघ, वर्गशिक्षक प्रिटींग व डाईंग विभाग, प्रा.नरेंद्र गव्हाणे वर्गशिक्षक विव्हींग विभाग, प्रा.भटू भामरे, प्रा.चेतन मराठे, प्रा.अविनाश सोनवणे, प्रा.कुंदन पाटील, प्रा.प्रिती पाटील, ग्रंथपाल विवेक पाटील, लिपीक वंदना माळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

LEAVE A REPLY

*