Type to search

maharashtra आवर्जून वाचाच धुळे मुख्य बातम्या

राज्य राखीव पोलीस दलाच्या धुळे गटाला स्वच्छता ट्रॉफीचे द्वितीय पारितोषिक

Share
धुळे । येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहाला स्वच्छता ट्राफीचे व्दितीय पारितोषिक मिळाले आहे.

राज्य राखीव पोलीस बलाचे अप्पर पोलीस महासंचालक यांच्या कल्पनेने महाराष्ट्र राज्यातील राज्य राखीव पोलीस बलाचे एकूण 1 ते 16 गटांमध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन 2016 पासून स्वच्छता ट्रॉफीचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक राज्य राखीव पोलीस बलातील सफाई तसेच कचर्‍याची आधुनिक पध्दतीने विल्हेवाट लावण्याच्या पध्दती आदि परिक्षेत्रातील मुल्यांकन समितीमार्फत पडताळणी करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येतात.

सन 2019 मध्ये देखील स्वच्छता ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अप्पर पोलीस महासंचालकांनी नियुक्त केलेल्या मुल्यांकन समितीने शहरातील राज्य राखीव पोलीस बल गट क्र.6, धुळे येथे दि. 3 मार्च रोजी भेट देवून मुल्यांकन केले असता स्वच्छता ट्रॉफी 2019 मध्ये द्वितीय क्रमांक पटकविलेला आहे.

स्वच्छता ट्रॉफी 2019 चे पारितोषिक मिळण्याच्या उद्देशाने राज्य राखीव पोलीस बल गट क्र.6, धुळेचे समादेशक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी केलेल्या नियोजनाच्या अनुषंगाने गटास स्वच्छता ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकविलेला आहे.

धुळ्याच्या नावलौकीकेत भर
सदर बाब ही धुळे शहराचे नावलौकीक मिळवून देणारी असून गटातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, वर्ग चार कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमुळे पारितोषिक मिळाले आहे.
-सचिन गोरे, समादेशक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!