महिला क्रिकेट स्पर्धेत पीडीसीएबी संघ व कोल्हापूर महिला संघ विजयी

0
धुळे । दि.27 । प्रतिनिधी-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महिलांच्या क्रिकेट स्पर्धा वरखेडी-कुंडाणे येथील मैदानावर सुरु आहेत.
स्पर्धेत पीडीसीएबी संघ पुणे व साऊथ झोन यांच्यात झाला. त्यात पीडीसीएबी संघाने 24 धावांनी विजय मिळविला.

पीडीसीएबी संघाने 25 षटकात 3 बाद 125 धावा केल्या, चार्मी गवई नाबाद 56 व उत्कर्षा पवार हिने नाबाद 22 धावा केल्या. साऊथ झोनतर्फे सोनल पाटील व शिवानी बुकटे प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.

साऊथ झोनने 25 षटकात सर्व बाद 101 धावा केल्या, सोनाली शिंदे 22, शिवाजी बुकटे 19 धावा केल्या. पीडीसीएबीतर्फे ईषा पठारे, उत्कर्षा पवार यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. प्रज्ञा विरकर, मृदुल व तेजश्री यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद करुन पीडीसीएबी संघाने 24 धावांनी विजय मिळविला.

दुपारच्या सत्रात कोल्हापूर व इस्ट झोनदरम्यान झालेल्या सामन्यात कोल्हापूर संघाने 61 धावांनी विजय मिळवला. कोल्हापूरने 25 षटकात तीन बाद 166 धावा केल्या.

अनुजा पाटील नाबाद 68 व सोनाली ननगरे नाबाद 20 धावा केल्या. ईस्ट झोनतर्फे मानसी बोर्डे व सपना पगारे प्रत्येकी 1-1 गडी बाद केला. इस्ट झोनने 25 षटकात 5 बाद 105 धावा केल्या.

दिव्याने नाबाद 43 तर राजश्री जाधव 20 धावा केल्या. ऋतुजा देशमुख, आदिती इंगवले, सुवर्णा शिंदे प्रत्येकी 1-1 गडी बाद केला, कोल्हापूरने 61 धावांनी विजय मिळवला. पंच म्हणून गणेश फुलपगारे व अनिल वाडेकर तर गुणलेखक म्हणून विजय अग्रवाल यांनी काम पाहिले.

 

LEAVE A REPLY

*