एसव्हीकेएम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये ‘स्पॅश’ सोहळा

0
धुळे । श्री विले पार्ले केळवणी मंडळ मुंबई संचलित धुळे येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी धुळे येथे स्पॅश 2019 द्वितीय वार्षिक स्नेहसंमेलन एसव्हीकेएम संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.

या प्रसंगी एसव्हीकेएम धुळे कॅम्पसचे सल्लागार डॉ. अजय पसारी व सौ. कविता अजय पसारी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. धुळे कॅम्पस प्रकल्प अभियंता ईश्वर पाटील, एसव्हीकेएम फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समीर गोयल, एसव्हीकेएम टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश साळुंखे, एसव्हीकेएम स्कूलच्या प्राचार्या सुनंदा मेनन, सी.ए. कुणाल पसारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर श्री विले पार्ले केळवणी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे प्राचार्य डॉ. निलेश साळुंके यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी बोलतांना प्राचार्य डॉ. निलेश साळुंके यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल सविस्तर विवेचन केले व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक केले. देशभरात संस्थेच्या शैक्षणिक विस्तार बाबत देखील त्यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस गतवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोनेरे द्वारे घेण्यात येणार्‍या वार्षिक परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतिय स्थान पटकावणार्‍या तसेच विद्यापीठस्तरावर व राज्यपातळीवर विविध खेळांमध्ये महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करून यश संपादित करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी नृत्य, कला, गायन तसेच विविध कला गुणांचे प्रदर्शन करून प्रेक्षकांची मने जिंकली. भव्य रंगमंच, अप्रतिम विद्युत रोषणाई आणि अतिशय सुंदर बैठक व्यवस्था अशा सर्व सुनियोजित व्यवस्था यांमुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तप्रिय वातावरणात संपन्न झाला. स्नेहसंमेलनाचे नियोजन कल्चरल को-ऑर्डीनेटर डॉ. धनंजय पाटील यांनी केले. त्यांना अतुल पटवारी, अनमोल सूर्यवंशी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नम्र जोशी यांनी केले. आभार प्रा. नम्र जोशी यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमास श्री विले पार्ले केळवणी मंडळ संचलित इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी धुळे येथील विद्यार्थी, पालक, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन देखील करण्यात आले होते. खेळांमध्ये लांब उडी, उंच उडी, रनिंग, कॅरम, बुद्धीबळ आदी खेळांचे आयोजन करण्यात आले. खेळाच्या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक मनोज सोनार यांनी केले. खेळामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी उस्फूर्तपणे भाग घेऊन खेळामध्ये चांगली कामगिरी दर्शवली. यादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध डे साजरे करून आनंदाने सहभागी झाले.

LEAVE A REPLY

*