पोलीस अधीक्षकांनी घेतला सुरक्षिततेचा आढावा

0
धुळे । दि.3 । प्रतिनिधी-शहरातील मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिराची पाहणी पोलिस अधीक्षक एम.रामकुमार यांनी करुन सुरक्षिततेचा आढावा घेतला.
शहरातील मालेगाव रोडलगत गाणू परिवाराने 1947 मध्ये विठ्ठल मंदिराची उभारणी केली. हे मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून ओळखले जाते.
या मंदिरात उद्या दि.4 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त यात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

कायदा व सुव्यवस्था अबादित रहावी, यासाठी आज पोलिस अधीक्षक एम.रामकुमार यांनी मंदिराची पाहणी केली व मंदिराचे ट्रस्टी गाणू परिवाराशी चर्चा केली.

मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिरात शहरासह पंचक्रोशीतून भाविक पहाटेपासून दर्शनाला येतात. यामुळे भाविकांची वर्दळ दिवसभर असते.

भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी मंदिरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचीही पाहणी पोलिस अधीक्षकांनी केली.

त्यानंतर मंदिर परिसरात कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांना पोलिस अधीक्षक एम.रामकुमार यांनी सूचना केल्या.

 

LEAVE A REPLY

*