उमेदवारांनी घेतला सोशल मीडियाचा धसका

प्रचाराचे पारंपारिक साहित्य झाले कालबाह्य : देशभरातील घटनांची गावपातळीवर चर्चा

0
तर्‍हाडी । राजकीय प्रचार सभेत आरोप प्रत्यारोपातुन होणारी टिकेवर सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेचा घडत आहेत. देशात कुठेही राजकीय घटना घडली तर त्याविषयी मतेमतांतरे स्थानिक पातळीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असल्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या पक्ष आणि उमेदवारांना व्हॉटस्अ‍ॅप गृप आणि फेसबुकवर विशेष लक्ष ठेवावे लागत आहे. राज ठाकरे यांच्या ‘दाखव रे तो व्हीडिओ’ हे वाक्य लोकप्रिय ठरत आहे. राज ठाकरे यांची जिल्ह्यात एकही सभा नसली तरी सोशल मीडियात त्यांच्या भाषणाची धुम आहे. असाच प्रकार काहीसा भाजपाच्या मीडिया सेल कडूनही सुरू असल्याने सर्वच उमेदवारांना प्रचारासह सोशल मीडियावरही लक्ष ठेवावे लागत असल्याने सोशल मीडियाचा धसकाच उमेदवारांनी घेतल्याचे सध्या तरी चित्र आहे.

सोशल मीडिया इतका संवेदनशील झाला आहे की विरोधी उमेदवार नेमका कुठे चुकते याची संधीच शोधली जात असून आपल्या उमेदवारासाठी त्याचा वापर करण्याचे उद्योग सध्या सुरू आहेत.

निवडणुक कोणतीही असो त्याकाळी मोबाईल नव्हते राजकीय सभेतील भाषणे त्यातील आरोप प्रत्यारोपावर कुणी जास्त लक्ष वेधून घेत नव्हते. काही झाले तरी गावभर चर्चे पुरता तो विषय असायचा. जाहीर प्रचारसभेत होणारी टिका आणी नंतर गावोगावी कट्टयावर रंगणारी चर्चा यातून ईर्षा टोकाला जायची गटातटाच्या राजकारणात व्यक्तिगत बदणामी टाळली जायची. गेल्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा फारसा वापर नव्हता. या निवडणुकीत मात्र, हेच माध्यम प्रभावी झाले आहे. प्रत्येकाकडे अ‍ॅनराईड मोबाईल असल्यामुळे व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, व्हिडिओच्या माध्यमातून बदनामी कशी होईल? यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न होत आहेत.

लोकसभा मतदारसंघाची व्याप्ती लक्षात घेऊन उमेदवारांना शेवटच्या मतदारापर्यत पोहोचणे सोशल मीडिया मुळे शक्य झाले आहे. व्हॉट्स अ‍ॅपचे डिपी स्टेटस त्यासाठी असलेल्या मजकुराचा माध्यमातून आपण आमुक एक उमेदवाराचे समर्थक आहोत असा संदेश दिला जात आहे. मागिल कोणत्या तरी निवडणुकीत राडा झाला असेल तर तो आजच झालल्याचे दाखवून खोटा प्रचार केला जात आहे. सोशल मीडियात व्हायरल व्हिडिओ वर लोकांचा पटकन विश्वास बसतो. प्रचारात आता सोशल मीडियाच प्रमुख भूमिकेत आहे. त्यामुळे निवडणुक यंत्रणेसमोर सोशल मीडियावरील बदनामी आणि त्यातून होणारा वाद डोकेदुखी ठरली आहे. प्रचारासाठीही याचा वापर केला जात आहे.

कार्यकर्त्यांमध्ये धमक नाही?
या आधीच्या काळात नेतेमडंळी मागे फिरणारे कार्यकर्ते यांची एका फोनवर कोणतेही काम व्हायचे. अगोदर बोलले ते करुन दाखवायचे. मात्र, अलीकडच्या काळात जे निवडणूकीच्या आखाड्यात बोलले जाते ते प्रत्यक्षात कुणीच करुन दाखवतांना दिसत नाही. त्यामुळे जस जसा काळ बदलत गेला तशीतशी कार्यकर्त्याची व नेत्यांची हवा गुल होत चालली असून आताच्या काळात पुढार्‍या मागे कार्यकर्ते दिसतच नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

प्रचाराची गाडी पण दिसेना…
अगोदर दिवसातून दोन वेळेस भोंगा, माईक बांधलेली वाहने प्रचारासाठी सकाळ, संध्याकाळ अशी दोन वेळेस यायची. मात्र, आता तर आठ दिवसातून एकदाचा कुठे प्रचाराची गाडी गावात दिसत आहे.

LEAVE A REPLY

*