पटेल संकुलाच्या 75 खेळाडूंची मॅरेथॉनसाठी निवड-सिंगापूर येथे होणार्‍या मॅरेथॉन स्पर्धेसाठी खेळाडूंना पाठविण्याची व्यवस्था

0
शिरपूर । प्रतिनिधी-येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या 75 खेळाडूंची मुंबई येथे होणार्‍या मॅरेथॉन स्पर्धेसाठी स्तुत्य निवड करण्यात आली आहे.
संस्थेच्या खर्चाने उत्कृष्ट खेळाडूंना सिंगापूर येथे होणार्‍या मॅरेथॉन स्पर्धेत खेळण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. संस्थेचे सह – अध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी फार्मसी कॅम्पसच्या मैदानावर सर्व खेळाडूंना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी हितगूज केले. यावेळी क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल उपस्थित होते.

आर.सी.पटेल शैक्षणिक संकुल व एस.व्ही.के.एम.संस्था, मुंबई यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल व संस्थेचे सह-अध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीसह अथक परीश्रमातून खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्न सुरु असतो.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी मजल मारली आहे. एस.व्ही.के.एम. संस्थेतर्फे मुंबई येथे दि. 20 ऑगस्ट 2017 रोजी होणार्‍या मॅरेथॉन स्पर्धेसाठी आर.सी.पटेल शैक्षणिक संकुल व एस.व्ही.के.एम. संस्थेच्या विविध शाखांमधील 75 खेळाडू सहभागी होणार आहेत.

या सर्व खेळाडूंची निवड मुंबई येथील मॅरेथॉन रनर अ‍ॅण्ड ट्रेनर समिर सतपाल व एस.व्ही.के.एम. संस्थेच्या स्पोर्टस् डव्हायजरी कमिटीचे मॅनेजर प्रदिप संपत यांनी केली.

या मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक पटकावणार्‍या संस्थेतील तीन खेळाडूंना सिंगापूर येथे होणार्‍या मॅरेथॉन स्पर्धेत धावण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.

या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी खेळाडूंना दररोज आर.सी.पटेल फार्मसी कॅम्पसच्या मैदानावर सराव करुन घेतला जात आहे. तसेच नियमितपणे सर्व खेळाडूंचा व्यायाम, आहार व सरावाचे धडे संस्थेतील सर्व क्रीडाशिक्षक, सर्व प्रशिक्षक व वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून देण्यात येत आहे.

 

 

LEAVE A REPLY

*