मुला-मुलींना सुसंस्कारीत करण्याचा प्रयत्न करा!

0
शिरपूर। मुलामुलींना सर्वांनी सुसंस्कारीत करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन माजी शालेय शिक्षणमंत्री, आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.

तालुक्यातील दहिवद येथील नूतन माध्यमिक विद्यालयात केंद्र शासनाच्या योजनेतील 20 लाख रुपये अनुदानातून उभारलेली अटल टिंकरिंग लॅब, कॉम्प्युटर लॅब, डिजीटल रुमचे उद्घाटन तसेच शाळेच्या प्रांगणात आर.सी.पटेल मेडिकल फाऊंडेशन शिरपूर यांच्या वतीने 67 व्या आरोग्य शिबीर, विकास योजना आपल्या दारी अभियानचे उद्घाटन आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आ. पटेल हे बोलत होते.

अध्यक्षस्थानी आ. काशिराम पावरा हे होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व सौ. सावित्रीताई फुले प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आ.डॉ.सुधीर तांबे, जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी जि.प. अध्यक्षा सौ.सरलाताई पाटील, बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, जि.प.सदस्या सौ.कल्पनाताई राजपूत, पं.स. उपसभापती संजय पाटील, धेंडू चौधरी, दहिवदच्या दोधेश्वर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शकुंतलाबाई चव्हाण, उपाध्यक्ष विनायक सूर्यवंशी, सचिव लक्ष्मीकांत चव्हाण, एल.ए.पाटील, प्रल्हाद पाटील, साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, शंकरा आय हॉस्पीटल आनंद, गुजराथचे डॉ.मोहित, डॉ.जयदीप, डॉ.रिकवेन, बाजार समिती संचालक अविनाश पाटील, नेतेंद्र राजपूत, सरपंच बालू चव्हाण, उपसरपंच रविंद्र पाटील, चुनिलाल पाटील, मांडळचे भटू माळी, रविंद्र राजपूत कळमसरे, गटशिक्षणाधिकारी पी.झेड.रणदिवे, नारायण राजपूत, मुख्याध्यापक एस.एस.चव्हाण, धाकलू गवळी, दिलीप चौधरी, भैया चव्हाण आदि उपस्थित होते.

पुढे बोलतांना आ. अमरिशभाई पटेल म्हणाले की, जमिनीत पाणी मुरविण्यासाठी तळमळीने काम करीत आहे. पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब तालुक्यात मुरविण्याचे व पाणी अडविण्याचे काम सुरु आहे. मी शिक्षणप्रेमी आहे. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नेहमी प्रयत्न सुरू आहे. शासनानेही शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी लक्ष घालावे. राज्यात व देशात आशादायी चित्र निर्माण व्हावे. चांगल्या पर्यावरणासाठी दहिवद परिसरासह तालुक्यात सर्वांनी मोठया प्रमाणात वृक्षारोपण करुन ती झाडे जगवावीत. प्रति माणूस पाच झाडे लावून ती जगविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. दहिवद शाळेच्या कामकाजाबद्दल मी व्यवस्थापनाचे कौतुक करतो. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे व चांगले काम करणार्‍या तालुक्यातील सर्व शाळांच्या शिक्षकांचे मी कौतुक करतो. प्रत्येकाने वाचनाची गोडी अंगीकारावी. सतत अभ्यास करावा. भुपेशभाई पटेल यांनी तालुक्यात आरोग्य शिबीरांतून सेवा देण्याचे चांगले कार्य हाती घेतले आहे.असे आमदार अमरिशभाई पटेल यांनी सांगितले.

आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, आ. अमरिशभाई पटेल यांचे कार्य राज्यासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. त्यांचे काँग्रेस पक्षासाठी देखील मोठे योगदान आहे. शिक्षण, उद्योग, शिरपूर पॅटर्न व सर्वच क्षेत्रात भाईंचे कार्य अतुलनीय आहे. ते दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यांचे नेतृत्व लाभल्याने शिरपूर तालुक्याचा विकास झाला आहे. सध्या राज्य सरकारचे शिक्षण क्षेत्राकडे मोठे दुर्लक्ष आहे. अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे फारच शैक्षणिक नुकसान होत आहे असे त्यांनी सांगितले.

आ.काशिराम पावरा म्हणाले की, संपूर्ण तालुक्याच्या विकासासाठी आ. अमरिशभाई पटेल व भुपेशभाई पटेल यांचे कार्य सतत सुरु आहे. गरजूंना न्याय देण्यासाठी तसेच अनेक प्रकारच्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात संस्थेचे सचिव लक्ष्मीकांत चव्हाण म्हणाले की, तालुक्यात आ.अमरिशभाई पटेल व भुपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वामुळे सर्वांनाच न्याय मिळाला आहे. जयवंत पाडवी यांनी आरोग्य शिबीरांबाबत माहिती दिली. आतापर्यंत 6800 लाभार्थ्यांचे डोळयाच्या शस्त्रक्रिया झाल्या असून 6200 जणांना चष्मे वाटप करण्यात आले. रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सरपंच बालू चव्हाण म्हणाले की, आ. अमरिशभाई पटेल यांनी तात्काळ यंत्रणा राबवून दहिवद येथील पाझर तालावाचे काम करुन दिले. त्यामुळे चांगल्या पावसानंतर या तलावाचा मोठया प्रमाणात शेतकरी बांधवांना व परिसरातील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाण्याचा उपयोग होईल. खा. शरदराव पवार यांनी नुकतेच आ. अमरिशभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव करुन जिल्हयासाठी व राज्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केल्याची बाब शिरपूर तालुक्यासाठी गौरवास्पद आहे.

LEAVE A REPLY

*