महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत रोहिणी येथे आरोग्य शिबिर

0
शिरपूर – तालुक्यातील रोहिणी या आदिवासी बहुल गावात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत आरोग्य शिबिर डॉ. जितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते झाले.
श्री. सिध्देश्वर मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल धुळे यांनी आयोजित केलेल्या या शिबिरात डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी 200 रुण्णांची मोफत तपासणी केली.
या आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने महिला व पुरुष यांनी तपासणी केली. त्यांना यावेळी मोफत औषधे देण्यात आले. तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रीयाचे गरज आहे.

अशा रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया सिध्देश्वर हॉस्पीटल धुळे येथे डॉ. जितेंद्र ठाकूर करणार आहेत. डॉ. ठाकूर यांनी महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची माहिती सांगितले.

या योजनेचा लाभघेण्याचे आवाहन केले. जुलैपासून सर्व महाराष्ट्रात ही आरोग्य योजना सुरु होणार आहे.

या शिबिरास डॉ. जितेंद्र ठाकूर, डॉ. कमलेश कुवर, सामाजिक कार्यकर्ते बन्सीलाल बंजारा, शिवा बंजारा, सिध्देश्वर हॉस्पीटमध्ये डॉक्टर व कर्मचारी, रोहिणी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक व शाम पाटील उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*