Type to search

आर.सी.पटेल फार्मसीला एनआयआरएफ मानांकन

maharashtra धुळे

आर.सी.पटेल फार्मसीला एनआयआरएफ मानांकन

Share
शिरपूर । केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे नॅशनल इन्सिस्टयुट ऑफ रॅकींग फ्रेमवर्क (एन. आय.आर.एफ.) अंतर्गत संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ट 100 विद्यापिठांचे व शैक्षणिक संस्थाचे रॅकिंग ठरविण्यासाठी 2018-19 शैक्षणिक वर्षासाठी नुकतेच प्रस्ताव मागविण्यात आले होते. विविध पारंपरीक विद्यापीठे तसेच इंजिनिअरींग, फार्मसी, मॅनेजमेंट, लॉ (विधी) आणि आर्किटेक्चर महाविद्यालयाकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विविध निकषांधारे ही क्रमवारी ठरविण्यात आली. त्यामध्ये संपूर्ण भारतातील फार्मसी विद्याशाखेतून सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांच्या यादीत शिरपूर येथील आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालय देशात 42 व्या स्थानावर झळकले.

नॅशनल इन्सिस्टयुट ऑफ रॅकींग फ्रेमवर्क यांच्या कठोर निकषांची परिपूर्णता झाल्या नंतर ही यादी मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत नुकतीच संकेतस्थळावर प्रकाशीत करण्यात आली आहे. मागील तीन शैक्षणिक वर्षांपासून भारत सरकारने हि मानांकन यादी प्रक्रिया सुरु केली आहे. आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालय सतत चार वर्षांपासून भारतातील पहिल्या 50 महाविद्यालयात स्थान प्राप्त करीत आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहिती प्रमाणे, ही रँकिंग प्रामुख्याने महाविद्यालयातील शिक्षण अदान- प्रदान पद्धती, संशोधन स्थर, विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्या नंतरचा विकास, परराज्यातील विद्यार्थ्यांचा कल तसेच इतर तज्ज्ञ व्यक्तींचे अभिप्राय ह्या मुख्य घटकांवरती आधारित असते.

शिरपूर येथील आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालयाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता असून नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडीटेशन कौंसिलचे मानांकन प्राप्त आहे. नुकताच महाविद्यालयाला नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडीटेशन (एनबी) या संस्थेचे थर्ड सायकल (तिसर्‍यांदा) मानांकन मिळाले असून सहा वर्षासाठी प्राप्त झाले आहे.

महाविद्यालयातील शिक्षण अदान- प्रदान पद्धती ही उत्कृष्ट दर्जाची असून, 40 हुन अधिक पीएचडी धारक प्राध्यापक येथे कार्यरत आहेत. तसेच 25 प्राध्यापक सध्या पी.एच.डी.चे शिक्षण पूर्ण करीत आहे. येथील आधुनिक शिक्षण पद्धतीने सुसज्ज असे स्मार्ट क्लास रूम्स, स्मार्ट बोर्डस, नव-नवीन इन्फॉर्मशन अँड कम्युनिकेशन टेक्निक्स, वेब-बेस्ड लर्निंग तसेच कम्प्युटर, लॅपटॉप्स, टॅब्लेट्स क्लाऊडिंग फॅसिलिटी, एकत्रित 2 कोटी रुपयांच्यावर पुस्तकांनी उपलब्ध असे भव्य ग्रंथालय या गोष्टींचा प्रभाव या रँकिंगमुळे अधोरेखित झाल्याचे दिसून येत आहे.

महाविद्यालयाला 25 वर्ष पूर्ण झाली असून संशोधन क्षेत्रात उच्च प्रतीचे योगदान सातत्याने दिसत आहे. आंतरराष्ट्रीय मानदंडानुसार असलेल्या प्रयोग शाळा व्यासंगी व अनुभवी प्राध्यापक वर्ग, ही महाविद्यालयाची वैशिष्ट्ये आहेत. 1000 हुन अधिक शोध निबंध, 8 पेटंट्स व 8 कोटी रुपयांहून अधिक संशोधन निधी महाविद्यालयाला प्राप्त आहे. विविध राष्ट्रीय संशोधन संस्था जसे आय.सी.टी.ई., यु.जी.सी., डी.एस.टी., आय.सी.एम.आर, आयुष ई. द्वारे प्राध्यापकांना 2 ते 5 वर्षांसाठी हे अनुदान मिळाले आहे. महाविद्यालयात जागतिक पातळीवरचे संशोधन क्षमता असून येथे औषधींच्या संशोधनासाठी लागणारे उपकरणे जसे डी. एस. सि., एच. पी. एल. सी., एच. पी. टी. एल. सी., स्क्रोडिंजर सॉफ्टवेअर, 600 हुन अधिक प्राणी असलेले ऍनिमल हाऊस या ठिकाणी उपलब्ध आहे. नेचर सारख्या सर्वोत्कृष्ट जर्नलमध्ये शोध निबंध प्रकाशित करणार्‍या भारतातील मोजक्याच शासकीय संस्थां व महाविद्यालये यामध्ये आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालयाचा समावेश आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ तसेच राष्ट्रीय स्तरावर विविध विक्रमांची नोंद केली आहे. विद्यापीठीय परिक्षांत सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी या महाविद्यालयाचे असतात. केवळ औपचारिक शिक्षण हेच महाविद्यालयाचे धोरण नाही. विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व परिपूर्ण होवून तो जागतिक स्पर्धेला आत्मविश्वासाने सामोरा गेला पाहिजे, या हेतुने महाविद्यालयात देश-विदेशातील तज्ज्ञांची व्याख्याने, प्रात्यक्षिके, शिबीर चर्चासत्र, दृकश्राव्य माध्यमांद्वारे संवाद आदी अनेक उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांचे बी. फार्मसीचे शिक्षण पूर्ण झाल्या नंतर येथील विद्यार्थी ऑल इंडिया जीपीटी, जीटीई सारख्या पोस्ट ग्रॅज्युएशन साठीच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षण घेत असतात. जीआरई ही आंतरराष्ट्रीय परीक्षा देऊन परदेशात शिक्षणासाठी जात असतात. मागील तीन वर्षांपासून कॅम्पस मुलाखतींमधून बहुराष्ट्रीय कंपन्या सरासरी 3 ते 4 लाखांचे वेतन देऊन येथील विद्यार्थ्यांची निवड होत आहे. यामध्ये मॅकलॉइड्स, टी. सी. एस., सन फार्मा, एमक्युर व इतर कंपन्यांचा समावेश आहे. महाविद्यालयात 100 टक्के प्लेसमेंट होण्यासाठी एक वेगळे प्लेसमेंट सेल उभारण्यात आलेले असून वर्ष भर हे प्लेसमेंट सेल विद्यार्थ्यांच्या नौकरी विषयी काम बघत असतात.

महाविद्यालयात पोस्ट ग्रॅजुएशन व पी. एच. डी. चे शिक्षण घेण्याच्या करीता पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली राज्यातून दर वर्षी विद्यार्थी व संशोधक येत असतात. ह्या सर्व 25 वर्षांच्या यशोगाथे मागे, महाविद्यालयाच्या राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, ए.पी.टी.आयचा प्रिंन्सीपल ऑफ द इयर पुरस्कार, आउट स्टॅडींग परफॉरमन्स वार्ड अशा कितीतरी पुरस्काराने सन्मानित झालेले प्राचार्य डॉ.एस.जे.सुराणा यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न करता गुणवान विद्यार्थ्यासाठी सुमारे 1 कोटीची पारिताषिके तसेच विशेष आर. सी. पटेल एक्ससेलन्स शिष्यवृत्ती योजना, आर. सी. पटेल मेमोरियल शिष्यवृत्ती योजना ई. मुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठच नव्हे तर देशभरात आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालयाचा नावलौकिक झालेला आहे.

या सर्व वैशिष्ट्यामुळेच एनआयआरएफच्या राष्ट्रीय क्रमवारीत आर.सी.पटेल महाविद्यालयाने अव्वल स्थान पटकावले आहे. प्राचार्य डॉ.संजय सुराणा यांनी या सर्व यशाचे श्रेय उप-प्राचार्य प्रा. डॉ. अतुल शिरखेडकर, विभाग प्रमुख, प्रा. डॉ. सी. आर. पाटील, प्रा. डॉ. एच. एस. महाजन, प्रा. डॉ. एस. एस. चालिकवार, प्रा. श्रीमती डॉ. एस. डी. पाटील, प्रा. डॉ. प्रीतम जैन, डिप्लोमा प्राचार्य डॉ. नितीन हसवानी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांना दिले.

याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपनभाई पटेल, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी कौतूक केले आहे.

संशोधन करण्यासाठी अधिक प्रेरणा
समाजाभिमुख संशोधन उच्च मुल्याधिष्ठीत उत्तम शिक्षण, तांत्रिक कौशल्यासह व्यक्तिमत्व विकास हिच भारतीय शिक्षणाची गरज बनली आहे. जी शैक्षणाची संस्था या गरजा पूर्ण करेल ती आपोआपच अग्रनामांकित बनेल. या राष्ट्रीय क्रमवारीतील स्थानामुळे आनंद झाल्याचे सांगत भविष्यात फार्मसी क्षेत्रात समाजापयोगी संशोधन करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाल्याचे प्राचार्य डॉ.संजय सुराणा याप्रसंगी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!