पौर्णिमा महाजनला 25 हजाराचे राज्यस्तरीय प्रथम बक्षीस

0
शिरपूर । दि.29 । प्रतिनिधी-शिरपूर तालुक्यातील खर्दे बु. येथील आर.सी.पटेल मराठी माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी पौर्णिमा दत्तात्रय महाजन या विद्यार्थिनीने संपूर्ण महाराष्ट्रातून घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सार्थ ग्रामगीता स्पर्धा परीक्षेत जिल्हयातून प्रथम क्रमांक पटकावला असून 25 हजार रुपयांचे रोख बक्षिस व स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र मिळाले आहे.
शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या मध्यवर्ती कार्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या हस्ते व सीईओ डॉ.उमेश शर्मा, प्राचार्य व्ही.आर.सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत या गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आला. तिला शाळेच्या शिक्षिका श्रीमती एस.आर.निकम यांचे मार्गदर्शन लाभले.

विश्व महामानव विचार प्रतिष्ठान राळेगाव जि. यवतमाळ यांच्या वतीने सार्थ ग्रामगीता र्स्प्धा परीक्षा घेण्यात आली. ग्रामगीता वाचा, आचरा व समृध्द व्हा या विचाराने त्यांच्यामार्फत धार्मिक कार्य सुरु आहे.

त्यांच्या मार्फत गीतेवर आधारीत तसेच धार्मिक ग्रंथावर आधारीत बहुपर्यायी लेखी परीक्षा घेण्यात आली. यात संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. यातून 250 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

पौर्णिमा दत्तात्रय महाजन या विद्यार्थिनीने सार्थ ग्रामगीता स्पर्धा परीक्षेत जिल्हाभरातून प्रथम क्रमांक पटकावला असून तब्ल 25 हजार रुपयांचे रोख बक्षिस व स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र मिळाले आहे.

नागपूर येथे दि.25 जून रोजी बक्षिस वितरण सोहळा संपन्न होवून तेथे तिला गौरविण्यात आले. ही विद्यार्थिनी शाळेत नववीच्या वर्गात शिकत असून दरवर्षी ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होते.

तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आ.अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपनभाई पटेल, सीईओ डॉ.उमेश शर्मा, सर्व संचालक, प्राचार्य व्ही.आर.सुतार, डी.बी.पाटील, डी.यू.राजपूत, श्रीमती एस.आर.निकम व सर्व शिक्षक यांनी कौतुक केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

*