शिरपूर येथे उद्या युवक काँग्रेसतर्फे युवा क्रांती यात्रा

0
शिरपूर । युवक काँग्रेसतर्फे युवाशक्तीच्या हक्कासाठी आणि फसव्या भाजपा सरकारच्या निषेधार्थ कन्याकुमारी ते काश्मिर प्रवास करणारी युवा क्रांती यात्रा शिरपूर येथे दि. 11 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता आर.सी.पटेल फार्मसी कॉलेज मैदान, करवंद नाका येथे दाखल होत आहे. यावेळी महाराष्ट्रासह देशभरातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. युवा क्रांती यात्रेचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यासाठी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसचे युवा नेते नगरसेवक तपनभाई पटेल यांनी केले.

या युवक काँग्रेसच्या युवा क्रांती यात्रेस माजी शिक्षणमंत्री, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रभारी प्रतिभा रघुवंशी, अखिल भारतीय युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव, अखिल भारतीय युवक काँग्रेस राष्ट्रीय उपाध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास, अखिल भारतीय युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव कृष्णा अल्लवरु, युवक काँग्रेस उत्तर महाराष्ट्र प्रभारी मनिष चौधरी, काँग्रेसचे युवा नेते नगरसेवक तपनभाई पटेल तसेच जिल्हाभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शिरपूर तालुक्यातील हजारोंच्या संख्येने युवक या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. युवा क्रांती यात्रेचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यासाठी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसचे युवा नेते नगरसेवक तपनभाई पटेल, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोगेश पावरा, जिल्हा उपाध्यक्ष आकाश मराठे, जिल्हा महासचिव रितेश राजपूत, जिल्हा महासचिव भुपेंद्र गुजर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष योगेश बोरसे, शिरपूर तालुका व शहर युवक काँग्रेस चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*