Type to search

maharashtra धुळे

कंटेनर-मोटारसायकल अपघातात मायलेक ठार

Share
शिरपूर । मुंबई-आग्रा महामार्ग तीन वरील हाडाखेड व सांगवी गावाच्या दरम्यान कंटेनरने मोटारसायकलीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आई व मुलगा जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. दोघे मयत हे शिरपूर तालुक्यातील पनाखेड येथील रहिवासी असून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर हाडाखेड सांगवी गावाच्या दरम्यान कालापाणी फाट्याजवळ दि. 14 मे रोजी सकाळी कंटेनरने (क्र. आर जे 14 जेडी 4028) मोटर सायकल (क्र. एमपी 46 एम एन 6936) ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शांतीराम भाया पावरा (वय 22) व रूपालीबाई भाया पावरा (वय 59) हे दोघी मायलेक जागीच ठार झाले. या घटनेमुळे पनाखेड गावावर शोककळा पसरली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!