Type to search

धुळे

शिरपुरात आज अत्याधुनिक अ‍ॅम्ब्युलन्सचे लोकार्पण

Share

शिरपूर । शिरपूर  रसिकलाल पटेल मेडिकल फाऊंडेशन व शिरपूर पीपल्स को ऑप बँक लि. शिरपूर यांच्या सौजन्याने अत्याधुनिक अशा लाईफ केअर कार्डीयाक अ‍ॅम्ब्युलन्सचे लोकार्पण उद्या दि.12 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता आर.सी.पटेल मेन बिल्डींग येथे तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

शहर व तालुक्यातील रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी ही कार्डीयाक अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करण्यात आली आहे. राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या सहकार्याने यापूर्वी 2010 पासून अत्याधुनिक कार्डीयाक अ‍ॅम्ब्युलन्स शहर व तालुक्यातील रुग्णांच्या सेवेत सुरू आहे.

विशेष स्वच्छता मोहितेचा आज शुभारंभ- शिरपूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने शहरात उद्या दि. 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता संत सेना नगर, करवंद रोडजवळ आर. सी. पटेल फार्मसी कॉलेजच्या मागे नाटुसिंग गिरासे यांच्या घराजवळ विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या विशेष स्वच्छता मोहिमेत संपूर्ण शहराची मोठया प्रमाणात साफसफाई करण्यात येणार आहे. तसेच डेंग्यू व इतर आजारांच्या बाबतीत घराघरात जावून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!