Type to search

धुळे

शिरपूर विधानसभा मतदारसंघात 67 टक्के मतदान

Share

शिरपूर । शिरपूर विधानसभा मतदारसंघात दि. 21 ऑक्टोबर रोजी सकाळ पासूनच मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. शहरात व ग्रामीण भागात देखील चांगले मोठया प्रमाणात मतदान झाले. सुमारे 67 टक्के मतदान झाले. संपूर्ण तालुक्यात मतदान शांततेत पार पडले.

भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय (आ. गट), मित्रपक्षांचे उमेदवार काशिराम वेचान पावरा यांनी सकाळी त्यांच्या गावी सुळे येथील जि.प.मराठी शाळेत मतदान केले.

महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई अमरिशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई मुकेशभाई पटेल, कक्कूबेन पटेल, किरणबेन पटेल, पटेल परिवारातील सदस्यांनी एस.टी. बस स्टॅण्ड समोरील शंकर पांडू माळी माध्यमिक विद्यालय वरवाडे शिरपूर येथे मतदान केले. तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, तालुकाध्यक्ष राहुल रंधे, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, शिवसेनेचे राजू टेलर, उपजिल्हा प्रमुख हिंमतराव महाजन, तालुका प्रमुख भरतसिंग राजपूत, शहर प्रमुख मनोज धनगर, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांच्या मतदार केंद्रांवर उत्साहात मतदान केले.

मतदानासाठी निवडणूक प्रशासन यंत्रणे मार्फत दि. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू होवून सायंकाळी 6 पर्यंत संपले. निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी विक्रमसिंग बांदल, तहसीलदार आबा महाजन, नगर परिषद मुख्याधिकारी अमोल बागुल, बीडीओ, सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी मतदानाची सर्व जबाबदारी पार पाडली.

शिरपूर मतदारसंघात 3,20,559 मतदार होते. त्यात 1,63,538 पुरुष मतदार असून 1,57,021 स्त्रिया मतदार होत्या. शिरपूर शहरात 60,303 मतदार असून 30,953 पुरुष व 29,350 स्त्री मतदार होते. तर ग्रामीण क्षेत्रात 2,60,256 स्त्री-पुरुष मतदारांचा समावेश आहे.

शिरपूर विधानसभा मतदारसंघात 329 मतदान केंद्र होते. शिरपूर विधानसभा मतदारसंघातील 329 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 329 मतदान यंत्रे, 329 कंट्रोल यंत्रे व 329 व्हीव्हीपॅट यंत्रे अशी ईव्हीएम यंत्रांची सोय करण्यात आली होती. 65 मतदान यंत्रे, 61 कंट्रोल यंत्रे व व्हीव्हीपॅट यंत्रे 88 असे ईव्हीएम यंत्रे राखीव ठेवण्यात आली होती. ती झोनल अधिकार्‍यांकडे उपलब्ध होती. मतदार संघातील मतदान केंद्रनिहाय 6 कर्मचार्‍यांचा समावेश असून त्यात 329 मतदान केंद्रांवर एकूण 1974 करणार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई व एक पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता.

विशेष मतदार केंद्र
शिरपूर विधानसभा निवडणूक प्रशासनाकडून शिरपूर शहरातील पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल मधील मतदान केंद्र क्र. 239 हे दिव्यांग संचालित व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळेतील मतदान केंद्र क्र. 235 हे महिला संचालित मतदान केंद्रासाठी स्थापन करण्यात आले. तर आदर्श मतदान केंद्र म्हणून मतदार संघातील केंद्र क्र. 183 जि.प.मराठी शाळा मांडळ येथील केंद्र होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!