Type to search

maharashtra धुळे

शिरपूर नगरपालिकेची 98 टक्के कर वसूली

Share
शिरपूर । शिरपुर नगरपरिषदेने 34 वर्षापासुनची सातत्यपुर्ण करवसुलीची परंपरा यंदाही कायम राखली असून, या आर्थिक वर्षात 98 टक्के करवसुली झाली आहे. त्यात घरपट्टी विभागाची 97.50 टक्के, तर पाणीपट्टी विभागाची 97 टक्के वसुली झाली असल्याचे घरपट्टी विभाग प्रमुख जगदिश बारी यांनी सांगितले.

सदर कारवाई सुभाष भोई, मल्लक आरिफ, राजेंद्र पाटोळे, मुकेश अहिरराव, विजय वैश्यवाणी, कैलास चौधरी, शेखर परिहार, प्रकाश बडगुजर, राजेंद्र मराठे, सुनिल बारी, मनोज खैरनार, दत्ता मोकाशे, भगवान महाजन, दिनेश बागुल, अशोक मराठे, देवराम बुवा, बालु मराठे, अनिल दंडवते, इसरार शेख, याकुबखॉ पठाण ब्रिजलाल माळी, उमेश मोरे, अरुण देवरे, बाजार विभाग प्रमुख दीपक मराठे, सुधाकर पाटील, भटू माळी यांच्या पथकाने केली.

तसेच पाणीपट्टी विभागातर्फे वसुली प्रमुख राजेंद्र ठाकुर, विठ्ठल मोरे, अशोक चौधरी, विजय बोरगांवकर, मुकेश अग्रवाल, प्रदीप गिरासे, रामकृष्ण चौधरी, भुपेश पाटील, रविंद्र मगरे, मोहन सोनवणे, एजाज कुरेशी, योगेश भोई, देविसिंग पावरा, राजु माळी,जनार्दन पंडीत यांनी वसुली करुन उद्दीष्टपुर्ती केली या दोन्ही विभागांना अकौटंट मोहन जडीये, इले.इंजि.राकेश वाडिले, शिक्षण विभाग प्रमुख मोहन चौधरी यांचे सहकार्य लाभले.

या दोन्ही विभागांच्या कामगिरी बद्दल नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, मुख्याधिकारी अमोल बागुल, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, नगर अभियंता माधवराव पाटील यांनी समाधान व्यक्त केले. व शहरातील करदात्यांनी वेळेवर न.पा. कर (घरपट्टी, पाणीपट्टी) भरुन शिरपुर शहराची 34 वर्षापासुनची परंपरा कायम राखली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!