Type to search

शिसाकावर जिल्हा बँकेचा ताबा

maharashtra धुळे

शिसाकावर जिल्हा बँकेचा ताबा

Share
शिरपूर । शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून साखर कारखाना ताब्यात घेतला आहे. न्यायालयाच्या आदेशाची अधिकृत प्रत हातात नसतांनाही न्यायालयाचा सन्मान राखत त्यांचा तोंडी आदेशाचे पालन करण्यात येवून कारखाना ताब्यात घेण्याची अमंलबजावणी पूर्ण केली. तरी कारखान्याच्या खराब अवस्थेबाबत व अनेक मुद्यांबाबत संभ्रम कायम असल्याचे दिसून आले.

जिल्हा बँकेचे सीईओ धिरज चौधरी हे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह शुक्रवार दि. 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजता कारखान्याचा ताबा कारखान्याच्या संचालक मंडळाकडे देण्यासाठी आले होते. ठरल्याप्रमाणे कारखान्याच्या वतीने यावेळी शिरपूर साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव पाटील, व्हाईस चेअरमन दिलीप पटेल, संचालक ज्ञानेश्वर पाटील, नारायणसिंग चौधरी, के.डी.पाटील, संचालक डी.पी.माळी, संचालक राहुल रंधे, बन्सीलाल पाटील, धनंजय पाटील, संग्रामसिंग राजपूत, भरत पाटील, प्रकाश चौधरी, वासुदेव देवरे, शामकांत करंकाळ, वकील ड. पी.पी.एंडाईत, कारखाना तज्ज्ञ व्यक्ती सी.झेड.मराठे, कारखान्याचे माजी अधिकारी, कर्मचारी, शेतकरी संघटनेचे ठाणसिंग पाटील, मोहन पाटील, ड. गोपालसिंग राजपूत, उमाकांत पवार, देविदास माळी, सुरेश पाटील, मनोहर पाटील आदी उपस्थित होते. तसेच जिल्हा बँकेचे सीईओ धिरज चौधरी, औरंगाबाद डी.आर.टी. मुल्यांकन इंजिनिअर श्रीकांत कोंडो, जिल्हा बँकेचे कर्ज विभागाचे व्यवस्थापक गोकुळ पाटील, बँक शिरपूर विभागाचे विभागीय अधिकारी भावराव बागल, कर्ज विभागाचे सिनिअर ऑफीसर विलास पाटील, बचत गट तपासणीस रमेश बोरसे, तपासणीस युवराज पाटील, रविंद्र देशमुख शिपाई, जयपाल देशमुख उपस्थित होते.

यापूर्वी ठरल्याप्रमाणे शुक्रवार दि. 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजता अनेकांच्या उपस्थितीत कारखाना प्रत्यक्षात पाहण्यास सुरुवात झाली. जिल्हा बँकेने दि. 6/10/2012 रोजी कारखान्यावर जप्ती बजावण्यात आल्यानंतर केलेल्या पंचनाम्याची प्रत आज वाचण्यात आली. पूर्वीचा पंचनामा आधारभूत धरुन कारखान्याची मशिनरी, चल व अचल संपत्ती, कारखाना परिसर, जमीन, इमारत, साखरसाठा, प्लॅन याबाबत तज्ज्ञांनी निरीक्षण करुन नोंदी घेतल्या. यावेळी संबंधीत अधिकारी, संचालक मंडळ तसेच पंच म्हणून नंदुलाल वंजारी (माजी चेअरमन वि.का.सो. लौकी), कैलास सोमा माळी वरवाडे, छोटू डोंगर पाटील शिरपूर, शरद वसंत भामरे वाडी, भिका उत्तम सोनवणे शिंगावे, नरेंद्र दुर्योधन गिरासे शिरपूर यांच्यासमक्ष पंचनामा करण्यात येवून कारखाना ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

यानंतर शेवटी जिल्हा बँकेचे सीईओ धिरज चौधरी यांच्या हस्ते कारखान्याचा ताबा शिरपूर साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव पाटील व संचालक मंडळाला रितसर देण्यात आला.

डी.आर.टी. न्यायालय औरंगाबाद मार्फत पुणे येथील बेंचने दि. 19/2/2019 रोजी निकाल दिला की, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात असलेली शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची सर्व मालमत्ता कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात यावी. ही अंमलबजावणी दि. 28 फेब्रुवारी रोजीच करण्यात यावी असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. परंतु, या आदेशाची प्रत प्रत्यक्ष हातात नसल्याचे बँकेचे अधिकारी व कारखान्याचे संचालक मंडळ यांनी सांगितले. तरीदेखील न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखत साखर कारखाना ताब्यात घेण्यास आम्ही तयार आहोत असे सांगून कारखाना संचालक मंडळाने नेमलेल्या तज्ज्ञांमार्फत कारखान्याच्या मालमत्तेची शहानिशा व आजची स्थिती लक्षात घेतली जाईल असे चेअरमन माधवराव पाटील, व्हाईस चेअरमन दिलीप पटेल, सर्व संचालक यांनी त्यावेळी देखील सांगितले होते.

यापूर्वी संपूर्ण मालमत्ता म्हणजेच साखर कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यासाठी बँकेचे अधिकारी कारखाना साईटवर आले होते. डी.आर.टी. न्यायालयाने निकाल दिल्याने गुरुवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता त्याबाबत कारखाना प्रवेशद्वारा जवळ कारखाना परिसरात बैठक झाली होती. मात्र, संचालक मंडळाने तज्ज्ञांमार्फत मालमत्तेची संपूर्ण शहानिशा केल्यानंतर कारखाना ताब्यात घेण्यात येईल असे स्पष्ट केल्यानंतर बँक व कारखाना दोन्ही बाजूने लेखी संमती जाहीर करुन पुढील तारखेला अंमलबजावणी करण्यात येईल असे कळविण्यात आले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!