Type to search

धुळे

शिरपुरात डॉक्टरला मारहाण

Share

शिरपूर । शिरपूर-वरवाडे नगर परिषद संचलित, इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग तज्ञ डॉ.दिनेश लिलाचंद पटेल यांना काल रात्री मद्यपी तरुणांनी मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ 15 जूनला डॉक्टर्स क्लबतर्फे मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.

दरम्यान डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ आज दिवसभर इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये संप पुकारून ओपीडी बंद ठेवण्यात आली होती. शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्य डॉक्टर्सतर्फे तहसील कार्यालयास निवेदन देवून या घटनेतील संशयितांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

काल रात्री दीडच्या सुमारासही घटना घडली. संशयित सतीश उर्फ अतुल माळी व हेमंत कुंवर उर्फ सोनू हे दोघे इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये गेले.

तेथे रात्रपाळीसाठी डॉ.वीरेंद्र पावरा हजर होते. दोन्ही संशयित मद्याच्या नशेत होते. त्यांनी डॉ.वीरेंद्र पावरा यांना ड्रेसिंग करून दे, असे सांगितले. नियमानुसार आधी केसपेपर काढा नंतर ड्रेसिंग करू, असे डॉ.पावरा यांनी उत्तर दिले. त्यामुळे चिडलेल्या दोघांनी त्यांना शिवीगाळ केली. डॉ.पावरा यांनी फोनवरूनही घटना डॉ.दिनेश पटेल यांना कळवली. ते तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहचले. त्यांनी संशयितांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनी त्यांची कॉलर धरून शिवीगाळ करीत मारहाण केली. हॉस्पिटलचा सिक्युरिटीसह कर्मचारी एकत्र होवू लागल्याचे पाहून दोघांनी पळ काढला. या घटनेनंतर डॉ.पटेल यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक दिगंबर पाटील तपास करीत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच आज इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉक्टर्स एकत्र जमले. त्यांनी घटनेचा निषेध करीत तहसीलदारांना निवेदन देवून संशयितांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. या घटनेच्या निषेधार्थ इंदिरा गांधी हॉस्पिटलमधील ओपीडी विभागाचे कामकाज दिवसभर बंद ठेवण्यात आले.

आज मोर्चा- येथील डॉक्टर्स क्लबतर्फे या घटनेच्या निषेधार्थ 15 जूनला मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता येथील बसस्टँड समोर किविप्र. संस्थेच्या कार्यालयापासून मूक मोर्चाला सुरवात होणार आहे. तेथून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात येणार आहे. या मोर्चाला केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, पॅथॉलॉजी लॅब असोसिएशन आदिंनी पाठिंबा दिला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!