शिरपूर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा !

0
शिरपूर । दि.28 । प्रतिनिधी-शिरपूर शहरातील वाढत्या चोर्‍या बंद करण्यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा अशा मागणीचे निवेदन स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय बाफना, एस.कुमार माळी यांनी पोलिस निरिक्षक संजय सानप यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोरीच्या सत्राला आळा बसावा म्हणून सी.सी.सी.टिव्ही बसविण्यात यासाठी स्वाभिमान प्रतिष्ठानातर्फे अर्थिक मदत केली जाईल असे आश्वासन प्रतिष्ठानाचे अध्यक्ष विजय बाफना यांनी पोलिसांना दिले.

शहरात रहदारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या बरोबर अपघाताचे ही प्रमाण वाढले आहेत. कर्णकर्कश हाँर्न असलेल्या वाहनांवर कारवाई करावी, तरुण रोडरोमिओंवर कारवाई करावी आदी मागणी करण्यात आली.

यावेळी पोलिस निरिक्षक संजय सानप, खेडकर, पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजय बाफना, एस.कुमार माळी, एम.के.भामरे, मोतिलाल शर्मा, मनोज संकलेचा, संजय कुंभार, मोहसिन बोहरी, गणेश जैन आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*