Type to search

maharashtra धुळे

कारसह सव्वा दोन लाखांची दारु जप्त

Share
शिरपूर । शिरपूर टोल नाक्याजवळ इंडीगो गाडीतून चोरटी वाहतूक करणारी विदेशी दारू पोलिसांच्या पथकाने पकडली असून कारसह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
पोलिस यंत्रणेला आज दि. 24 एप्रिल रोजी मध्यप्रदेश येथून दारूची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने शिरपूर टोल नाका येथे सापळा लावला असता. एम.एच 18 व्ही 2722 क्रमांकाची इंडीगो कार येतांना आढळून आली. सदर गाडीची तपासणी केली असता गाडीत 40 हजार 500 रूपये किंमतीचे इंपेरियल ब्युल कंपनीचे विदेशी दारूच्या सात बाटल्या. तसेच 76 हजार 800 रूपये किंमतीच्या 480 बाटल्या असा दारूचा साठा आढळून आला. या ठिकाणाहून पोलिसांनी एक लाखांची कारसह 2 लाख 17 हजार 300 रूपयांचा मुद्येमाल जप्त केला. याप्रकरणी दिपक बन्सीलाल शिरसाळे (वय 25 रा. पळासनेर) याला अटक केली आहे.

सदर कारवाई पोनि शिवाजी बुधवंत, पोना किरण बागुल, ललित पाटील, रविंद्र माळी, पोकाँ योगेश कोळी, अमोल पगारे, मुकेश पावरा, अमित रनमळे, स्वप्नील बांगड, महेंद्र सपकाळे यांच्या पथकाने केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!