गणपतीसाठी आजीने पैसे कमी दिले : सातवीच्या मुलाची आत्महत्त्या

0
शिंदखेडा । तालुक्यातील भडणे येथील इयत्ता सातवीत शिकणारा भूषण भगवान खरखार (पाटील) (वय 13) मुलाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दि.12 रोजी सकाळी 9 वाजता घडली. याबाबत शिंदखेडा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भडणे येथील भगवान आत्माराम खरखार यांचा जनता हायस्कूल शिंदखेडा येथे सातवीत शिकणारा भूषण (वय 13) याने गणपती बसवण्यासाठी आजी कडून पैसे मागितले होते. आजी दीडशे रुपये दिले पण भूषणने अजून पन्नास रुपयांची मागणी केली. ते देण्यास नकार दिला त्यामुळे भूषणला राग आला.

त्याने राहत्या घरातील खांब्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भूषणच्या पश्चात आई-वडील, आजी, भाऊ असा परिवार आहे. याबाबत शिंदखेडा पोलीसठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक पी. सी. निंबाळे ह करीत आहेत.

LEAVE A REPLY

*