Type to search

maharashtra धुळे

11 गावांमध्ये 310 किराणा किट्सचे वाटप

Share
शिंदखेडा । शिंदखेडा तालुक्यातील विविध 11 गावांमध्ये एक महिना पुरले एवढा किराणा साहित्याच्या 310 किट्सचे वाटप जैन एलर्ट ग्रुप मुंबईचे महाराष्ट्र सर सेनाधिपती जिनेशभाई दोसी व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी जिनेशभाई दोसी, विनयभाई शाह, कीर्ती जैन, दिनेश शाह, जतिन शाह, शिंदखेडा शाखाचे अध्यक्ष कल्पेश जैन, सचिव सुमित जैन, उपाध्यक्ष अक्षय बाफना, शिंदखेड़ा श्री संघचे अध्यक्ष अशोक राखेचा, महामंत्री प्रा. चंद्रकांत डागा, भागचंद कर्नावट, विजय बोथरा, शुभम गिडिया उपस्थित होते. हे वाटप जैनाचार्य श्री रत्नसूरीसुंदर यांच्या संयम जीवनला 52 वर्ष पूर्ण झाले, यानिमित्ताने करण्यात आले. यासाठी शेठ श्री मतोशा साधार्मिक भक्ती केंद्रचाचे सहकार्य मिळाले. तसेच शिंदखेडाचे सुमित प्रवीणकुमार जैन यांनी 31 हजार, अशोक राखेचा दोन हजार, चंद्रकांत डागा एक हजार रूपयांची मदत केली. या दुष्काळ मदत कार्यासाठी अनेक दाते पुढे आले आहेत. शिंदखेड़ा एलर्ट ग्रुपने आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

परसामळ, वरुळ, वरझडी, जखाने, रोहणे, दलवाड़े, टेमलाय, दभाषी, शिंदखेड़ा, पिंपळखेड़ा, चांदवड या गावांना किराणा साहित्याचे वाटप केले. विविध 16 वस्तु असलेली 28 किलो वजनाची किराणा साहित्याची ही एक किट आहे. वाटप प्रसंगी जिनेश भाई दोसी यांनी सांगितले की, महाराष्टामध्ये दुष्काळची भयंकर स्थिती पाहुन आम्ही मुंबईत असून व्यथित झालो. त्यासाठी मदत कार्य करण्याचा विचार झाला. तीन वर्षा आधी आम्ही शिंदखेडा किराणा साहित्य व टँकरने पाणी वितरित केले होते. या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात 5 हजार 500 किराणा साहित्याच्या किट्सचे वाटप करण्यात येणार आहे. जनावरांसाठी चारा व पाणी टँकरने पुरविण्यात येणार आहे. जिनेश भाई यांनी ज्या गांवात मदत कार्य पोहचली आहे, असे गाव व्यसन मुक्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच मांसाहारमुहे प्राणी हत्या होते. सर्व प्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे. यासाठी शाकाहार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

परसामळ येथे जयसिंग गिरासे, वरुळ प्रवीण मराठे, दलवाडे सरपंच भटू देसले, टेंभलाय निखील पाटील, दभाषी सरपंच विकास पाटील व ग्रामस्थानी जैन एलर्ट ग्रुपचे आभार मानले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!