Type to search

धुळे

श्री सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून सर्वसामान्याचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न

Share

शिंदखेडा | शिंदखेडा तालुक्यातील मौजे माळीच येेथे नुकतेच कोल्हापूर पद्धतीचा साठवण बंधारा गुलाजार नदीवर पावसाळ्यापुवीर्र्च बांधण्यात आला आहे. सदर बंधारा बांधण्यासाठी १५ लाखाचा निधी श्री सिद्धीविनायक ट्रस्ट, मुंबईच्या माध्यमातून प्राप्त झाला होता. या बांधार्‍याच्या कामासाठी शिवसेचा ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी विशेष प्रयत्न केले होते. बंधार्‍याचे काम पूर्ण होऊन यावर्षीच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाले आहे. या जलसाठ्याचे जलपुजन काल. दि.२१ ऑगस्ट रोजी शिवसेना सचिव तथा सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, संपर्क संघटीका प्रियंका घाणेकर उपस्थित होते.

याप्रसंगी शिवसेना सचिव आदेश बांदेकर म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने श्री सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरीब, सर्वसामान्य व शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी करीत आहेत. असे त्यांनी सांगितले.

जलपुजनानंतर शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत माऊली संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित माऊलींच्या समस्या जाणून घेतल्या व समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आपल्या सोबत आहेत आहेत असा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

श्री.सिद्धीविनायक ट्रस्ट च्या माध्यमातून गुलजार नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आलेला आहे. सदर बंधार्‍यामुळे माळीच, गोराणे,कलमाडी, वारुड, नरडाणा येथील नागरीकांना शेतीला व पिण्याचा पाण्याचा लाभ होणार आहे. गेल्या चार वर्षापासून या परिसरातील शेतकर्‍यांना दुष्काळाचा व पाण्याचा सामना करावा लागत आहे. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने गुलजार नदीला पाणी आल्याने संपुर्ण बंधार्‍यात पाणी साचले आहे. या बंधार्‍याचे काम अवघ्या पंधरा लाखात झाले असून त्यामुळे पाच गावांतील लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे. असे त्यांनी सांगितले.

या बंधार्‍याच्या साठवलेल्या पाण्यामुळे परिसरातील सिंचन विहीरीची जलपातळी वाढली असून गावातील पिण्याचा पाण्याचा शेतीसाठी लागणार्‍या पाण्या प्रश्‍न सुटल्यामुळे गावकर्‍यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमास शिवसेना जिल्हासंघटक मंगेश पवार, उप जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, हिम्मत महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख छोटू पाटील, तालुकाप्रमुख विश्‍वनाथ पाटील, भरतसिंग राजपूत, कल्याण बागल, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, तालुका संघटक डॉ.मनोज पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका कविताताई क्षीरसागर, युवासेनेचे उपजिल्हा युवाधिकारी गिरीष पाटील, महिला आघाडी तालुका संघटीका ज्योतीताई पाटील, शिंदखेडा शहरप्रमुख नंदकिशेार पाटील, दोंडाईचा शहरप्रमुख चेतन राजपूत, मनोज धनगर, संघटक प्रेमकुमार चौधरी यंाच्यासह माळीच ग्रामपंचायतीचे गटप्रमुख गणेश पाटील, सरपंच श्रीमती कुसुमताई ठाकरे, सदस्य हिरकबाई आखाडे, आशाबाई ठाकरे, विश्‍वास पाटील, चतुर पाटील, वसंत पाटील, उद्धव पाटील, नानाभाऊ पाटील, रमन आप्पा, नंदू पायील, रमेश पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील शुभम पाटील, प्रविण पाटील, हनुमंत पाटील, देविदास पाटील, संतोष पाटील, लघुसिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंता ए.बी.पाटील, ग्रामसेवक शरद ठाकरे यांंच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!